बारामतीत काका-पुतण्यामध्ये लढत, युगेंद्र पवार अजितदादांना देणार टक्कर…

  • Written By: Published:
बारामतीत काका-पुतण्यामध्ये लढत, युगेंद्र पवार अजितदादांना देणार टक्कर…

Sharad Pawar Group candidate list : विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने पहिली यादी जाहीर केली. पुण्यामध्ये जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं केली. बारामतीमध्ये शरद पवारांनी युगेंद्र पवारांन (Yugendra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात उमेदवारी दिली.

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीतून युगेंद्र पवार तर शेवगावात प्रताप ढाकणेंना उमेदवारी 

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यादीनुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इस्लामपूरमधून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काटोलमधून, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घनसांगवीतून, पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा-कळव्यातून आणि हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

इच्छुक म्हणून येणार अन् गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी, स्क्रिनशॉट व्हायरल 

दरम्यान, काल अजित पवार गटाने पहिली यादी जाहीर करताच अजित पवार पुन्हा एकदा बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गट कोणता उमेदवार उभा करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र हे राजकारणात सक्रिय झाले होते. आता पक्षाने त्यांनी विधानसभेची उमेदवारी दिली. बारामतीत युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे चुलते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही हायव्होल्टेज लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, याआधी बारामतीची लढाई अजित पवारांसाठी सोपी एका अर्थी सोपी होती. त्यांच्या विरोधात तितका तगडा उमेदवार नव्हता. पण, यंदा मात्र, त्यांचे काका आणि राजकीय गुरू शरद पवारांनीच त्यांना आव्हानं दिलं. त्यामुळे यंदा होणारी ही निवडणूक बारामतीकरांसाठी महत्त्वाची असणार आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. ते विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत. युगेंद्र पवार हे शरयू ग्रुपच्या माध्यमातून व्यवसायात सक्रिय असून त्यांनी शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली आहेत. युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर युनियनचे अध्यक्षही आहेत. याशिवाय,  शरयू साखर कारखानाही ते पाहतात.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube