शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीतून युगेंद्र पवार तर, वळसेंच्या विरोधात निकम
Ncp Sharad Pawar Group Candiate List : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असताना सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. एकूण 45 जणांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची यादी उद्या किंवा परवा जाहीर करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना तर शेवगाव मतदारसंघातून प्रताप ढाकणे यांना तर हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीयं. तसेच इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना विरोध होऊनही शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांनाच उमेदवारी दिलीयं.
Maharashtra State President of the NCP (Sharadchandra Pawar faction), Jayant Patil says, “Yogendra Pawar to contest from Baramati assembly constituency…”
Meanwhile, NCP fielded Deputy CM and party chief Ajit Pawar to contest from Baramati. #MaharashtraElection2024 pic.twitter.com/RZIRkAxwPL
— ANI (@ANI) October 24, 2024
कोणाला मिळाली उमेदवारी?
इस्लामपूर – जयंत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप
काटोल – अनिल देशमुख
धनसावंगी – राजेश टोपे
कराड-उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव-ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर – अशोक पवार
शिराळा – मानसिंगराव नाईक
विक्रमगड – सुनिल भुसारा
कर्जत-जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायक पाटील
सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भांबळे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव-शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर-पूर्व- दिनेश्वर पेठे
तिरोडा – रविकांत बोपचे
आहेरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर-पूर्व- राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वर्पे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर-शहर-उत्तर – महेश कोठे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजित घाटगे
कवळे-महांकाळ- रोहित पाटील