उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद! दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान

उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद! दिल्ली विधानसभेसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान

Voting for Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (दि. ५ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. हे मतदान येथील सर्व 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (Delhi )कार्यालयाच्या माहितीनुसार 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत येथे झाली. यामधून कोण बाजी मारणार? हे येत्या ८ फेब्रुवारी आपल्याला कळणार आहे.

तुझ्या बापाला साथ दिली, गप्प बस; माजी पंतप्रधानांच्या मुलाला बोलताना खरगेंची जीभ घसरली

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम मशीन बंद करण्यात येत आहेत. मात्र रांगेमध्ये उभे असलेल्या लोकांना संध्याकाळी सहा नंतर देखील मतदान करता येणार आहेत. यामध्ये मुस्तफाबाद या जागेवर 66.68% एवढं सर्वाधिक मतदान झालं. तर करोल बाग या ठिकाणी 47.40% हे सर्वात कमी मतदान झाल्याचा पाहायला मिळालं.

धनंजय मुंडेंच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना… आणखी एक प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता

कडक सुरक्षा व्यवस्था

निवडणूक आयोगानं दिल्लीतील सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. मतदान निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात व्हावे, यासाठी मतदान केंद्रांवर सीआरपीएफच्या २२० कंपन्या, १९,००० होमगार्ड जवान आणि ३५,६२६ दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यासोबतच संवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षेवर खास लक्ष ठेवण्यात आले होते. मतदान केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी दिल्ली विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकूण ९७,९५५ कर्मचारी आणि त्याचबरोबर ८,७१५ स्वयंसेवक कार्यरत होते.

मतदान केंद्रावर सजावट

मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता निवडणूक आयोगानं दिल्लीतील मतदान केंद्रावर आकर्षक पद्धतीनं सजावट करण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. मतदानाला प्रोत्साहन मिळण्याकरिता सेल्फी पॉइंट्सवर फोटो काढता यावेत, यासाठी सेल्फी पॉइंट्सदेखील काढण्यात आले होते. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना पिण्याचे पाणी, शौचालये इत्यादींची व्यवस्था देखील करण्यात आली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक गुलाबी बूथ, एक मॉडेल बूथ आणि एक दिव्यांग बूथ तयार करण्यात आले होते

पुण्यात रंगणार हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा जंगी आखाडा; पुनीत बालन ग्रुपचाही पुढाकार

चुरशीची निवडणूक

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षानं (आप) सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय शक्ती पणाला लावली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याकरिता विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले आहेत. उल्लेखीय बाब म्हणजे इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि आपचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभे राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube