सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली! भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ आज मुंबईत; विधीमंडळ नेता ठरणार?

सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली! भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ आज मुंबईत; विधीमंडळ नेता ठरणार?

BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालंय. भाजप आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीची राज्यात सत्ता आली असून आता सत्तास्थापनेसाठी भाजपकडून (BJP) जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचा विधीमंडळ नेता ठरवण्यासाठी आज मुंबईत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) मुंबईत दाखल होणार आहेत.

अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्यांची मंत्रि‍पदी वर्णी लागण्याची शक्यता; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

भाजपकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीयं. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका सीतारामण आणि रुपाणी यांच्यावर असणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर या निरीक्षकांकडून भाजपच्या सर्व आमदारांची बैठक 4 डिसेंबरला पार पडणार आहे. या बैठकीतच भाजपचा विधीमंडळ गटनेता ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

EVM मध्ये फेरफार म्हणून भाजपला 10 टक्यांचा लाभ, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय. त्यामुळं आता पुन्हा महायुतीच सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी 5 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. शपथविधी सोहळा 5 तारखेला संध्याकाळी होणार आहे. मात्र, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल? हे अजून देखील गुलदस्त्यातच आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

थंडी गायब, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

महायुतीने नव्या सरकारच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी केलेली आहे. धनंजय मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेत्यांची सोहळ्याच्या तयारीसाठी धावाधाव सुरू असल्याचं समोर येतंय. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू असून यासाठी भव्य मंडप उभारण्याचं काम देखील सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube