थंडी गायब, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update Rain Alert for Next 2-3 Days : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचं चित्र (Maharashtra Weather Update ) आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक(Rain Alert) हवामान तयार झालंय. त्यामुळं गारठं काहीसं कमी झालेलं आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. यामुळे आंबा, काजू यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान 3 ते 4 डिसेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तर राज्यात इतर ठिकाणी मध्यम अन् हलक्या सरींचा अंदाज देखील व्यक्त करण्यात (Weather Update Today) आलाय. 3 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि 4 डिसेंबर रोजी सातारा आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलाय.
…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करणार; भरत गोगांवलेंनी दिली आतली माहिती
पुणे, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. चक्रीवादळामुळे राज्यात पडलेल्या थंडीचा गारठा संपणार आहे. सध्या महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरुवात झाली असून ढगाळ वातावरणामुळे उकाडा देखील काही प्रमाणावर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलीय. धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 6.1 अंश तापमान, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 10.05 अंश तापमानाची नोंद झालीय.
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल
1 डिसेंबर रोजी सकाळपर्यंत 24 तासांत रत्नागिरीत 34.2 अंश तापमानाची नोंद झालीय. आज राज्यात ढगाळ हवामान आहे. किमान तापमानात वाढ राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. यातच कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. ‘फेइंजल’ चक्रीवादळ जमिनीवर आलंय. उत्तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावर देखील चक्रीवादळ सक्रिय आहे. या वादळाची तीव्रता आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तर महाराष्ट्रात हवामान ढगाळ झालंय.