Rain Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक पावसाने हजेरी (rain) लावल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता पुन्हा हवामान खात्याने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला. (Rain Alert) आज महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता (Unseasonal Rain) हवामान खात्याने वर्तवली आहे.
ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात 32 रुपयांची कपात, चेक करा नवीन दर
रविवारी राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस पडेल. 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस कोसलेल, असा अंदाज आहे.
तळीरामांना आनंद! आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर, महिला उमदेवाराचं अजब आश्वासन
अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला असू या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांत आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तर जम्मू काश्मिर सह लडाखमध्ये काही भागात मुसळधार पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आङेत. तर तर हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी देखील हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी उष्णतेची लाट
एकीकडे राज्यासह देशभरात पावसाची रिपरिप सुरू आहे, तर दुसरीकडे काही भागात तापमानात वाढ झाली आहे. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट सुरू आहे. 1 आणि 2 एप्रिल रोजी तेलंगणात वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 1 ते 4 एप्रिल दरम्यान रायलसीमामध्ये विविध ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा सर्वाधिक हॉट
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात रविवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यात काहीशी घट झाली असली तरी उष्णतेने शहरवासीयांना हैराण केले आहे.