ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात 32 रुपयांची कपात, चेक करा नवीन दर

ग्राहकांना दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात 32 रुपयांची कपात, चेक करा नवीन दर

LPG Price Cut: देशात लोकसभा निवडणुक (Lok Sabha elections) होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत (LPG Price Cut) मोठी कपात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG cylinder rates) कपात केली आहे. मात्र, ही कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्येच (Commercial gas cylinders) करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलेंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

तळीरामांना आनंद! आनंदाच्या शिध्यात देणार व्हिस्की अन् बिअर, महिला उमदेवाराचं अजब आश्वासन 

गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसतांना पाहायला मिळत होता. मात्र, आता तीन महिन्यांनंतर गॅस सिलेंडर दर कमी झाले आहेत. तेल उत्पादक कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करतात. LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती एप्रिल महिन्याच्या दिवशी लागू झाल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत काही बदल करण्यात आले आहेत. आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता तिथे व्यावसायिक सिलेंडर 1879 रुपयांना मिळणार आहे.

Munmun Dutta : बबिताचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये स्टायलिश अंदाज, दिलखेच अदांनी चाहते घायाळ 

तर मुंबईत एका सिलेंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.याशिवाय लखनौमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1877.50 रुपये, जयपूरमध्ये 1786.50 रुपये, गुरुग्राममध्ये 1770 रुपये आणि पटनामध्ये 1770 रुपये झाली आहे.

IOCL वेबसाइटनुसार, हे बदललेले दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोचा एलपीजी सिलेंडर दिल्लीत 1795 रुपये, कोलकात्यात 1911 रुपये, मुंबईत 1749 रुपये आणि चेन्नईमध्ये 1960.50 रुपयांना मिळत होता.

महिला दिनी घरगुती सिलेंडरमध्ये कपात
यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने ग्राहकांना 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर मोठा दिलासा दिला होता. यानंतर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली. सध्या या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.

एलपीजीच्या दरात तीन महिन्यांनी घट

गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. मार्च महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. याआधी फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याशिवाय जानेवारी महिन्यातही एलपीजी सिलेंडर 1.50 रुपयांनी महागला होता. आता तीन महिन्यांनंतर एलपीजी स्वस्त झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज