इराण-अमेरिकेच्या युद्धात मोदी सरकारने देशभरात लागू केला ESMA कायदा काय? नक्की काय होणार…

What Is ESMA Act अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू असून, भारतात एलपीजी आणि कर्मिशअल गॅसचा तुटवडा जाणवत आहे

  • Written By: Published:
इराण-अमेरिकाच्या युद्धात मोदी सरकारने देशभरात लागू केला ESMA कायदा काय? काय बदलणार?

What Is ESMA Act : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील इंधन, गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. घरगुती गॅसचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (दि.10) अत्यावश्यक वस्तू कायदा (एस्मा) लागू केला आहे. हा कायदा नेमका काय? ESMA कायद्याच्या कक्षेत कोणत्या सेवा येतात? त्याबद्दल जाणून घेऊया…

Explainer : कंपन्या, स्मशानभूमी बंद; युद्धामुळे महाग झालेल्या गॅसने देशासह पुण्याचा बिघडवला ‘खेळ’

ESMA कायदा म्हणजे नेमकं काय?

– ESMA (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) हा कायदा भारतीय संसदेने 1968 साली मंजूर केलाय

– आपातकालीन काळात आवश्यक सेवा आणि सुविधांचा विनाखंड पुरवठा सुरु राहावा, यादृष्टीने याची निर्मिती

– दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मामध्ये समावेश

– संपाच्या काळात कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर

– त्यामुळे बंद आणि कर्फ्यूच्या काळातही कर्मचाऱ्यांना काम करण्यास नकार देता येत नाही

ESMA कायद्याच्या कक्षेत कोणत्या सेवा येतात?

– सार्वजनिक संरक्षण, स्वच्छता, जल पुरवठा, रुग्णालये आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित सेवा

– पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद आणि खनिज उत्पादन आणि वितरणाशी निगडीत असलेल्या संस्था आणि कंपन्या

– याशिवाय, बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि खाद्यपुरवठा खरेदी आणि वितरण संबंधित सरकारी संस्था

– राज्य सरकार स्वतंत्रपणे किंवा अन्य राज्यांच्या मदतीने आपापल्या प्रदेशात या कायद्याची अंमलबजावणी करु शकते

युद्धाच्या झळा! कच्च तेल 100 डॉलर प्रति बॅरलवर सरकार दर किती दिवस स्थिर ठेऊ शकणार?

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर संकट

अमेरिका-इराण युद्धाचे आणि पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद पडल्या आहेत. मुंबईतील हॉटेल असोसिएशनच्या मते, गेल्या काही दिवसांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा १० ते २० टक्क्यांनी कमी झाला आहे. रेस्टॉरंट मालक गॅस सिलिंडर मागवत आहेत, परंतु त्यांना वेळेवर डिलिव्हरी मिळत नाही. यामुळे दररोज हजारो ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेलच्या स्वयंपाकघरांना काम करणे कठीण झाले आहे. सध्या गॅसचा तुटवडा वाढत आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतील अनेक रेस्टॉरंट्स पुढील दोन दिवसांत बंद होऊ शकतात.

देशात इंधनाचा तुटवडा नाही; HPCL कंपनीकडून सर्व ग्राहकांना मेसेज

एलपीजीचे उत्पादन वाढविण्याचे निर्देश

देशातील गॅस टंचाई दूर करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आणि अतिरिक्त उत्पादन घरगुती वापरासाठी वळवण्याचे निर्देश दिले आहेत. घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात येणार असून, साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग नियम लागू करण्यात आला आहे.

follow us