युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता, कोणालाही सोडले जाणार नाही; पेपरफुटी प्रकरणात PM मोदींची पहिली प्रतिक्रिया  

PM Modi On NEET Paper Leak Case : संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. युवकांचं हित

PM Modi On NEET Paper  Leak Case

PM Modi On NEET Paper Leak Case : संबंधित विभागांनी आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता असून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करणार असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, आपल्या तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य यापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही. पेपर लीक प्रकारांत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आम्ही ‘फास्ट-ट्रॅक’ न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व यंत्रणांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांची ही मालिका अशीच सुरू राहील. जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सोडले जाणार नाही असं पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे.

 

पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)  यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टीसह (CJP) हजारो विद्यार्थीं आंदोनल करत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह विरोधकांनी देखील पाठिंबा दिल्याने मोदी सरकारवर आता दबाव वाढताना दिसत आहे.

राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणात कारवाईची मागणी करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच 20 जुलै रोजी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील राहुल गांधी यांच्याकडून  करण्यात आली आहे.

follow us