‘लोकसभा निवडणुकांमूळे गाजराचाही पाऊस पडू शकतो’; इंधन दर कपातीवरुन सुळेंची जळजळीत टीका

‘लोकसभा निवडणुकांमूळे गाजराचाही पाऊस पडू शकतो’; इंधन दर कपातीवरुन सुळेंची जळजळीत टीका

Supriya Sule News : लोकसभा निवडणुकांमुळे (Loksabha Election) गाजराचाही पाऊस पडू शकतो, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे.

निलेश लंके नेमक्या कोणत्या गटात? पवारांच्या डोक्यात प्लॅन काय?

सुळे म्हणाल्या, निवडणुकीच्या 15 दिवस आधी गॅसच्या दरात कपात केली जाते हे मला खूप गमतीशीर वाटतं. मी संसदेत प्रत्येक भाषण मन लावून आणि कान देऊन ऐकत असते. जेव्हा दरवाढ होते तेव्हा कंपन्यांनी दर वाढवले, सरकारने दर वाढवले नाहीत असं सांगितलं जातं, मग जेव्हा दर कपात केली जाते तेव्हा त्याचं क्रेडिट सरकार घेतं आणि इंधनाचे दर वाढवतं तेव्हा कंपनीवर खापर फोडतात हा कुठला न्याय आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच इंधनाचे दर वाढले तरी कंपनी आणि दर कमी झाले तरी कंपनीलाच क्रेडिट गेलं पाहिजे. तुमच्या सोयीनेच सगळं काही होत नाही. आता तर लोकसभेच्या निवडणूका आल्या आहेत, काहीही होऊ शकतं, गाजराचा पाऊसही पडणार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई

सध्या मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. याआधी कधीच सरकारकडून केंद्रीय यंत्रणा ईडी, सीबीआय, इनकम टॅक्ससारख्या स्वायत्त संस्थांमध्ये सरकारने हस्तक्षेप केलेला नव्हता. आता मात्र, दुर्देवाने अदृश्य शक्ती या यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत पक्षफोड, घर फोडीचं, दडपशाहीच राजकारण केलं जात आहे. सध्या लोकशाही संपत चालली असून दडपशाही सुरु आहे, हे भाजप सरकारचंच पाप असल्याचीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणांची सुनावणी घेतांना ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मागील 15 वर्षांपासून मी राष्ट्रवादीच्या विचारांचीच खासदार आहे. मी संसदेत केलेल्या भाषणांबद्दल सत्ताधारी नेत्यांकडून ऑन रेकॉर्ड माझी प्रशंसा केली जाते. यामध्ये मंत्री आश्विनी वैष्णव, नितीन गडकरी, निर्मला सीतारामण यांनी अनेकदा प्रशंसा केलेल्या आहेत. ज्यांना माझ्यावर काही आरोप करायचे असतील करु द्या, विरोधक जरी असला तरी तो दिलदार असला पाहिजे, तभी तो मज्जा है त्यामुळे टीका करण्याचा हक तो बनता है ना, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज