लोकसभा निवडणूक स्वबळावरच लढणार, जानकरांच्या निर्णयामुळं वाढलं मविआ आणि महायुतीचे टेन्शन
अहमदनगर – लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जवळ येऊ लागल्यानं राजकीय नेते आणि पक्ष संघटना दावे, घोषणा करत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) सहभागी तब्बल सोळा पक्षांपैकी एक महत्वाचा पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच निवडणूका लढवणार आहे, असं म्हणत जानकरांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा, दलालांना धडकी : पेपर फोडणाऱ्यांना घाम फुटेल असा मोदी सरकारचा कायदा
राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पदाधिकारी मेळावा जानकर यांच्या उपस्थितीत नगरमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यातील ९० हजार ७०० पोलिंग बूथ पैकी ६२ हजार पोलिंग बूथ पक्षाने बांधली आहेत. सर्व जिल्ह्यामध्ये संघटन वाढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. राज्यात माझ्या पक्षाचे खासदार व आमदार होणार हे नक्की आहे. त्यामुळेच भाजप व कॉंग्रेस बरोबर येण्यासाठी माझ्यामागे लागले आहेत. मात्र येणारी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार आहे, असं जानकर म्हणाले
Sonali Kulkarni : सोनालीने शेअर केला ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील लूक
पुढं बोलतांना जानकर म्हणाले, आज माझ्याकडे इतर पक्षातील अनेकजण तिकीट मागत आहेत. नगरमध्ये पक्षाचे संघटन अजून मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहे. याआधी भाजप बरोबर युती केली होती. मात्र त्यांनी आमच्या तोंडाला पाने पुसली. भाजप व कॉंग्रसने देशाची वाट लावली आहे. त्यामळे आगामी काळात जनतेला राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होत आहे, असंही महादेव जानकर म्हणाले.
जानकर पुढे म्हणाले, राज्यात ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणीही वाली नाहीये. त्यामुळे राज्यात या समाजाची अवस्था सैरभैर झाली आहे. म्हणून ओबीसींचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय या समाजांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्व ओबीसी, भटक्या समाजाने एकत्र यावे. आज गोपीनाथ मुंढे असते तर हे समाज असे सैरभैर झाले नसते. असे सांगून स्वबळावर लोकसभा निवडणुक लढण्यासाठी पूर्ण ताकदीने तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केलं.
जानकर यांच्या घोषणेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टेन्शनमध्ये आहे. महादेव जानकर यांच्य स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळं महायुतीच्या ‘मिशन-45’ला धक्का बसू शकतो. तसंच महाविकास आघाडीच्या हक्कांच्या मतांमध्येही विभाजन होऊ शकते. मात्र, येत्या काळात जानकर खरचं रासपच्या चिन्हावर स्वंतत्र लढणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.