उद्या महानगरपालिकांसाठी मतदान; जरांगे पाटलांचा कुणाल पाठिंबा? भूमिका केली जाहीर
मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. (Election) या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाला काही तास बाकी असताना आपली भूमिका जाहीर केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा दिला नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. माझ्या नावानं कोणी पत्रक प्रसिद्ध करत असेल त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असंहीजरांगे म्हणाले आहेत.
माझा राज्यातील कोणत्याच शहरात कोणत्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी असा कुणालाही पाठिंबा नाही. माझे जूने व्हिडिओ कोणी व्हायरल करत असतील तर ते चूकीचे आहे. माझ्या नावाने कुणी पत्रकं प्रसिद्ध करत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. जर कुणी स्थानिक पातळीवर पिठींबा दिला असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत विषय असेल त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Municipal Corporation Elections : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
आपण या निवडणुकीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रमध्ये कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी महाविकास आघाडी किंवा महायुतीला कसलाही पाठिंबा दिलेला नाही. पाठिंबाचे काही पत्रक प्रसिद्ध झाले असेल किंवा मुंबईमध्ये काही प्रकार झाले असतील, परंतु माझा कुणालाही पाठिंबा नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारे ते जर कोणी उभे असतील त्यांना मात्र मराठा समाजाने सहकार्य करू नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ते लोक मराठा समाजाच्या लेकरांच्या मुळावर उठलेले आहेत, ते लक्षात घ्यावं. मुंबईसह, महाराष्ट्रात कोणाला पाठिंबा दिलेला नाही, हे लक्षात घ्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. मुंबई असो की महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकीत कोणाला पाठिंबा दिलेला नाही. चळवळीत असणाऱ्या पोरांवर सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
