मांजरी बुद्रुक-केशवनगरमध्ये शिवसेनेची प्रचारात आघाडी; ठिकठिकाणी जोरदार स्वागत

भानगिरे यांच्या माध्यमातून शासननियुक्त सदस्य अमर घुले व विकी माने यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी प्रभागासाठी दिला आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 13T174439.978

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री (Pune) लाडकी बहिणी योजना महिलांच्या उत्कर्षासाठी प्रभावशाली ठरली आहे. नगर विकास मंत्री म्हणून शिंदे यांचा थेट प्रभागाच्या विकासात सहभाग असणार आहे. हा विकास सक्षमपणे राबविण्यासाठी शिवसेनेने अनुभवी उमेदवार दिले आहेत.

मी केशवनगरच्या उपसरपंच व सदस्यपदी काम केले आहे. त्यामुळे मला नियोजनबद्ध विकासाचा अनुभव आहे. प्रभागातील चारही गावांत पूर्वीपासून लोणकर कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांना मानणारा वर्ग आहे. त्या सर्वांच्या मदतीने प्रभागात विकास पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही उमेदवार संदीप लोणकर यांनी दिली.

बिबट्याबरोबर लांडगे पण आले, एखादा नासका आंबा असतो, अजित पवारांचा लांडगेंवर वार

एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरक्षित वाहतूक, केशवनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुरेसा पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील वाचनालय अशी कामे आम्ही करणार आहोत.

उपमुख्यमंत्री शिंदे व शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या माध्यमातून शासननियुक्त सदस्य अमर घुले व विकी माने यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी प्रभागासाठी दिला आहे. त्यातून रस्ते, सांडपाणी अशा पायाभूत सुविधा येथे केल्या आहेत. नागरिकांची सुरक्षा, आरोग्य व सर्वसमावेशक विकास आराखडा करण्याचा आमचा संकल्प असल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले.

follow us