फेज्ड ऑपरेशन की दीर्घ युद्ध? ‘एपिक फ्युरी’ किती दिवस चालणार
इस्त्रायलने तेहरान या इराणच्या राजधानीवर हल्ला चढवला. त्यानंतर काही वेळातच अमेरिकेने देखील इराणविरोधात लष्करी कारवाई करत हल्ले सुरू केले.
What Is Operation Fury America Launch Massive Operation Iran In Trouble : मिडल ईस्टमध्ये तणावाने धोकादायक वळण घेतले आहे. इस्त्रायलने शनिवारी तेहरान या इराणच्या राजधानीवर हल्ला चढवला. त्यानंतर काही वेळातच अमेरिकेने देखील इराणविरोधात लष्करी कारवाई करत हल्ले सुरू केले. इराणमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईला अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्यूरी असे नाव दिले आहे.
ऑपरेशन एपिक फ्यूरीमुळे मिडल इस्टमधील तणाव प्रचंड वाढला असून वॊशिंग्टन, तेल अवीव आणि तेहरान यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेला शॅडो कॉन्फ्लिक्ट आता उघड लष्करी कारवाईत परावर्तित झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनची माहिती अमेरिकेने स्वात दिली असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने यासांदरबाह्त अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.
ऑपरेशनची सुरुवात कशी झाली?
इराणविरोधातील हल्ल्यांची सुरूवात सर्वप्रथम इस्त्रायलने केली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितले की, इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणविरोधात ऑपरेशन सुरू केले आहे. हाती आलेल्या वृत्तांनुसार, इस्त्रायलने आपल्या लढाऊ विमानांद्वारे प्री एम्प्टीव्ह कारवाई करत इराणी ठिकाणांवर हल्ले चढवले. या हल्ल्यानंतर लगेच अमेरिकन सैन्य देखील ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आणि इराणमधील निवडक लष्करी लक्षणांवर आक्रमण सुरू केले.
सहा इराणी शहरांवर हल्ल्यांचे वृत्त; आखाती देशांनी हवाई क्षेत्र बंद केले, अमेरिकन ठिकाणांवर हल्ल्यांचा दावा
अमेरिकेचा मोठा दावा
मिडिया रिपोर्टनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांवरून इराणी ठिकाणांवर टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ मिनिटांचा व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत या कारवाईत अमेरिका सहभागी असल्याची पुष्टी केली. दरम्यान इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इसराइल कात्स यांनी संपूर्ण इस्रायलमध्ये विशेष आणि कायमस्वरूपी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.
किती काळ चालणार ‘एपिक फ्युरी’?
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दावा केला आहे की, हे एक टप्प्याटप्प्याने राबवले जाणारे ऑपरेशन आहे. ही केवळ एकदिवसीय मर्यादित कारवाई नसून, ती अनेक दिवस चालू शकते. अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीनंतर अमेरिकेची ही आतापर्यंतची सर्वात मोठी लष्करी मोहीम ठरू शकते, असंही बोललं जात आहे.
अमेरिका का झाली सहभागी?
डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका अशी आहे की, इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवावा आणि अमेरिकेसोबत नवा करार करावा. मात्र इराणने या प्रस्तावाला वारंवार नकार दिला आहे. त्याचबरोबर इराणमध्ये सुरू असलेले अंतर्गत आंदोलन आणि अस्थिरता लक्षात घेता, अमेरिकेला ही कारवाई करण्यासाठी धोरणात्मक संधी मिळाल्याचे मानले जात आहे. सध्या ऑपरेशन एपिक फ्यूरी मुळे मिडल इस्टमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षाचे पुढील परिणाम काय असतील आणि तो व्यापक युद्धात परावर्तित होईल का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
