अजित पवारांच्या अपघाताविषयी सरकार संशय निर्माण करतय, सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडावी
हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये,असं राज ठाकरे म्हणाले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाला उद्या एक महीना होईल. त्यांच् निधनानंतर हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरू आहे. (Ajit Pawar) आमदार रोहित पवार या या घटनेचा तपास व्हावा, यातील चौकशीला का उशीर होतोय अशा मुद्यांवरून आक्रमक झालेले आहेत. तसंच एफआयआरही काही लोक नोंदवून घेत नसल्याने आता हा संघर्ष अधिक वाढला आहे. दरम्यान, आज रोहित पवारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये,असं राज ठाकरे म्हणाले. रोहित पवारांनी सर्व मुद्दे, टेक्निकल गोष्टी सांगितल्या, त्यांचा FIR का दाखल करून घेतला जात नाहीये. चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का निर्माण केले जातात असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. यावरून संशय येण्यास वाव असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
आमदार रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, अजित पवार प्रकरणात केली ही मोठी मागणी
रोहित पवार यांच्याशी बोलल्यावर मला एकच गोष्ट जाणवली की, त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला ते गेल्यावर तिथले अधिकारी एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते, पण ते टाईप करत असताचनाच तिथे डीसीपी आले. आणि त्यांनी सांगितलं की एफआयआर लिहून घ्यायचा नाही. हे कशासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
हे जे काही घडतय त्याची उत्तर मिळाली पाहिजेत. जर तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण त्याबद्दल घरच्या लोकांनाच काही संशय असेल. किंवा चौकशी नीट व्हावी यासाठी त्यांना एफआयआर करायचा असेल, तर त्यामध्ये सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत? असा थेट सवालही राज ठाकरे यांनी सरकारला विचारला. त्याचबरोबर याव विषयावर आता सुनेत्रा पवार यांनी बोललं पाहिजे.
यामधील विषय पाहता सुनेत्रा पवार यांचे ते पती होते. त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे. आणि एफआयआर घेऊ नका, असा दबाव सरकारकडून येत आहे. कुठंही एफआयआर नोंदवू शकता असं लोकांना सांगितलेलं आहे. पण एफआयआर नोंदवायला गेल्यावर जर त्या माणसासमोर अडथळे आणत असाल तर यात काही काळंबेर आहे का? असा संशय निर्माण होतो. सरकारच संशय निर्माण करतंय असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
