मोठी बातमी! मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, बंद दाराआड दोघांची चर्चा

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • Written By: Published:
Raj Thackeary And Shinde

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, (MNS) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चा झाली आहे. विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पहिलीच भेट आहे. मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी वेगवेगळी लढवली होती, प्रचार सभेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल देखील केला होता. मात्र त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नंदनवन या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

रस्ता बांधला अन् टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी? एक्सप्रेसवे प्रकरणात राज ठाकरे भडकले

दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्च झाली आहे, या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेनंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. ही निवडणूक दोन्ही पक्षांनी वेगवेगळी लढवली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, भविष्यामध्ये काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का? की आता ही नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात आहे ? असे प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहेत.

यापूर्वी देखील अनेकदा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, मात्र महापालिका निवडणुकीनंतर ही पहिलीच भेट असल्यामुळे या भेटला महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेनं यावेळी शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली होती, मात्र तरी देखील मनसेला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलं नाही. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

follow us