Mumbai : दिवाळीच्या तोंडावर लक्झरी बसमधून माव्याची बेकायदेशीर वाहतूक!

दिवाळीच्या तोंडावर गुजरातहून मुंबईत लक्झरी बसमधून माव्याची बेकायदेशीर वाहतूक सुरु असल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे.

Mumbai To Gujrat Khoya

Mumbai : ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्झरी बसमधून बेकायदेशीर माव्याची (खवा) वाहतूक सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातहून मुंबईत येणाऱ्या एका लक्झरी बसधून मिठाईसाठी मावा (Mumbai ) (खवा) घेऊन येत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडलीयं. या माव्यामध्ये (खव्या)मध्ये टॅलकम पावडर मिसळल्याचा संशय कार्यकर्त्यांना आल्याने कार्यकर्त्यांनी तत्काळ टिळकनगर पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देऊन कारवाई केलीयं.

या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालाची वाहतूक केल्याप्रकरणी परिवहन विभागाने ४८,००० दंड आकारला आहे. तर मालासहित बसला पुढे जाण्याची परवानगी का देण्यात आली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच संबंधित बसचा प्रवासी परवाना रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आलीयं.

या मालाचे इनव्हॉइस किंवा ई-वे बिल सादर करण्यात आले नसल्याने GST फसवणुकीचाही संशय आहे. तसेच माव्यामध्ये टॅलकम पावडर मिसळल्याचा संशय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने FDA आणि मुंबई पोलिसांकडे व्यक्त केला आहे. टिळक नगर पोलिसांच्या मदतीने FDA विभागाला माहिती देऊन संपूर्ण माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. २-३ दिवसांत अहवाल अपेक्षित असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

follow us