आजच्या राजकारणात ‘गुलामांचा बाजार’, सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांचं भाष्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांमधील कलाकार, व्यासंगी व्यक्तिमत्त्व आणि निर्भीड राजकारणी यांचा सखोल आढावा घेतला.
Raj Thackeray’s commentary on current politics : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत बाळासाहेबांमधील कलाकार, व्यासंगी व्यक्तिमत्त्व आणि निर्भीड राजकारणी यांचा सखोल आढावा घेतला. बाळासाहेबांचे कलेवरील निस्सीम प्रेम आणि त्यांच्या विचारांची व्यापकता यावेळी त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, आजच्या राजकारणात ‘गुलामांचा बाजार’ तयार झाला आहे. चावडीवर उभं राहून जसं माणसांचे लिलाव चालायचे, तसंच चित्र आज महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब आज हयात नाहीत, हेच बरं आहे, असं वाटतं, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त… pic.twitter.com/iDRAjiYWSh
— Raj Thackeray (@RajThackeray) January 23, 2026
शिवसेनेपासून वेगळं होण्याच्या काळातील भावना व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, “मी शिवसेनेतून बाहेर पडलो, तेव्हा ते पक्ष सोडणं नव्हतं, तर घर सोडणं होतं.” त्या घटनेला आता 20 वर्षांचा काळ लोटला असून, या काळात अनेक गोष्टी उमगल्या आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. मात्र त्या गोष्टींवर आता बोलण्यात अर्थ नाही, असं सांगत त्यांनी विषयाला पूर्णविराम दिला. बाळासाहेब ठाकरे या विषयावर स्वतंत्र व्याख्यान द्यायला मला आवडेल, असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, “तो माणूस नेमका कसा होता, हे जगाला पूर्णपणे कधी कळलंच नाही. मला त्यांना लोकांसमोर मांडायला आवडेल.” यावेळी त्यांनी सकाळी केलेलं ट्विट वाचून दाखवत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर भाष्य केलं. “हिंदुत्व ही एक राजकीय शक्ती बनू शकते, हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं. ते भाजपलाही जमलं नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला.
झेडपीत घराणेशाहीचा कहर; सोलापूर, पुण्यात नेत्यांच्या घरातच तिकीट !
आज हिंदुत्वाचा जो बाजार मांडला जातोय, तो बाळासाहेब पाहू शकले नसते, असंही ते म्हणाले. बाळासाहेबांनी हिंदूंना हिंदू म्हणून जाग केलं, ते कुणाचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, हा त्यांचा खरा संदेश होता, असं सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव केला.
