मोठी बातमी : अहिल्यानगरमधील तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात? एटीएसची छापेमारी, अनेकांकडे चौकशी

ATS-ATS-टीएसने राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. यवतमाळमधील पुसद आणि उमरखेडमधील चौदा ठिकाणी छापेमारी केलीय.

  • Written By: Published:
ATS Conducts Major Operations Across The State

ATS conducts major operations across the state And Ahilyanagar: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (
ATS) राज्यभरातील चौदा ठिकाणी छापेमारी केलीय. त्यात अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सात ठिकाणी ही छापेमारी झालीय. काही तरुण हे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई एटीएसने केलीय. या प्रकरणात अनेकांकडे चौकशी केली जात आहे. परंतु अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

या कारवाईबाबत एएनआयने एक्सवरून वृत्त दिलंय. एटीएसने राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या आहेत. यवतमाळमधील पुसद आणि उमरखेडमधील चौदा ठिकाणी छापेमारी केलीय. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरसह इतर सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. दहशतवादी संघटनांशी काही जण संपर्कात असल्यावरही एटीएसही ही शोध मोहिम सुरू केलीय.


पुण्यात भाजप-काँग्रेस आंदोलनाला हिंसक वळण, एकमेकांवर दगडफेक, पोलीस तैनात


14 संशयितांना घेतले ताब्यात

अहिल्यानगरमधील कारवाईच्या वेळी तलवारी जप्त करण्यात आल्या. आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तपासले जात आहे. अहिल्यानगरमधून 14 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या कारवाईत आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. संशयितांची सविस्तर चौकशी सुरू असल्याचे एटीएसकडून सांगण्यात येत आहे. या कारवाईसाठी एटीएसने स्थानिक पोलिसांची मदत घेतली आहे.

19 वर्षीय तरुणाची सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक झुंज; स्वतः युक्तिवाद करून जिंकली MBBS प्रवेशाची लढाई


उत्तर प्रदेशमधील छंगूर बाबा कनेक्शनबाबत तपास

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कथित धर्मांतर रॅकेटच्या चौकशीच्या संदर्भात छंगूर बाबाचा जवळचा सहकारी इधु इस्लाम याला नागपूर येथून अटक केली होती. स्थानिक पोलिस, महाराष्ट्र एटीएस आणि यूपी एटीएस यांच्या संयुक्त पथकाने ही अटक झाली होती. कथित धर्मांतर नेटवर्कसाठी निधी आणि रसद हाताळण्यात इधु इस्लामने महत्त्वाची भूमिका बजावली. या कनेक्शन आहे का याबाबत चौकशी सुरू आहे.

follow us