Leopard In Ahilyanagar : अहिल्यानगर पुणे मार्गावर गाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
Leopard In Ahilyanagar : गेल्या काही दिवसांंपासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर काही भागात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
Leopard In Ahilyanagar : गेल्या काही दिवसांंपासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर काही भागात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी प्रशासनांकडून अलर्ट देखील जारी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, अहिल्यानगर – पुणे मार्गावर (Ahilyanagar – Pune Road) कामरगाव (Kamargaon) जवळ गाडीच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, स्माईल स्टोन हॉटेलजवळ मंगळवारी 11 नोव्हेंबर सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. धडक झाल्यानंतर काही काळ बिबट्या जिंवत अवस्थेत होता मात्र जबर मार लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली असून त्यांनी बिबट्याला ताब्यात घेतला आहे. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे नगर तालूक्यात ही घटना घडल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील (Leopard In Ahilyanagar) उत्तरेसह दक्षिणेत देखील बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी डॉ. आशिया
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, काही भागांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मानव आणि पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे. ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन द्यावे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी गावा-गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती कार्यक्रम राबवावेत.
ईश्वरपूरमध्ये भाजपला धक्का, माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
राष्ट्रीय स्तरावर संपर्कासाठी 1926 हा क्रमांक उपलब्ध आहे. जिल्हास्तरावर स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू करून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
