भारताचा मानवी अंतराळ प्रवास 2027 मध्ये; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात
एखाद्या खेळाडूने 98 टक्के अंतर पार केले तरी त्याला यशस्वी मानले जात नाही. अंतराळ मोहिमांमध्येही पूर्ण अचूकता हाच यशाचा निकष असतो.
Preparations for Gaganyaan mission in final stage : अंतराळ मोहिमांमध्ये आंशिक यशाला स्थान नसते. प्रत्येक मोहिमेत शंभर टक्के अचूकता आवश्यक असते, असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी केले. आकुर्डीतील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभ गुरुवारी (दि.05) झाला. त्यावेळी डॉ. नारायणन बोलत होते.
यावेळी डीवायपीआययूचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डीवायपीआययूचे विश्वस्त तेजस एस. पाटील, कुलगुरू प्रा. मनीष भल्ला, आरआयआयआरचे अध्यक्ष प्रा. प्रभात रंजन, कॅम्पस डायरेक्टर रिअर ऍडमिरल (नि) अमित विक्रम, डी. वाय. पाटील कोल्हापूर येथील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुररू डॉ. राकेशकुमार शर्मा, तळसंडेचे कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, डीवायपीआययूचे कुलसचिव प्रो. बीरन मोईदिन बीएम, नॉन इंजिनीअरिंगच्या डीन प्रा. माधवी देशपांडे, अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. अनुपमा पाटील, परीक्षा नियंत्रक प्रा. मधुरा जगताप आदी उपस्थित होते. विद्यापीठाचे विश्वस्त तेजस एस. पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आकुर्डीतील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा पाचवा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 784 विद्यार्थ्यांना कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात ‘लिबरल आर्ट्स’ अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा कुलगुरु मनीष भल्ला यांनी केली.
अजितदादांच्या मनात काय होते, हे मी 9 फेब्रुवारी नंतर बोलेन; रोहित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
डॉ. नारायणन म्हणाले की, एखाद्या खेळाडूने 98 टक्के अंतर पार केले तरी त्याला यशस्वी मानले जात नाही. अंतराळ मोहिमांमध्येही पूर्ण अचूकता हाच यशाचा निकष असतो. पुण्याच्या वैज्ञानिक क्षमतेचा उल्लेख करत त्यांनी कोविड काळात येथे तयार झालेल्या लसींचा देशभर झालेला उपयोग अधोरेखित केला. चंद्रयान 2 चे 2019 मधील सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले. मात्र, त्यातून धडे घेत 10 सदस्यांच्या समितीने 30 दिवसांत शिफारसी केल्या. शंभरहून अधिक सुधारणा अमलात आणल्यानंतर चंद्रयान-3 चे ऐतिहासिक यश मिळाले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरलेला पहिला देश ठरला.
नोकरी शोधण्याऐवजी रोजगारनिर्माते व्हा…
व्ही. नारायणन म्हणाले की, सुरुवातीच्या काळात रॉकेटचे भाग सायकल आणि बैलगाडीतून नेले जात होते. आज मात्र, भारताने अंतराळ तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे. मंगळ मोहिमेचे यश, चंद्रावर पाण्याचे अणू शोधणे, एकाच वेळी अनेक उपग्रह प्रक्षेपण यांसारख्या कामगिरींचा त्यांनी उल्लेख केला. डिग्री ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून समाजाच्या योगदानाचे फलित आहे. नैतिकता, संघभावना आणि जोखीम घेण्याची तयारी हीच यशाची गुरुकिल्ली आहे. नोकरी शोधण्याऐवजी रोजगारनिर्माते व्हा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण संस्था सेवा भावनेतून चालवल्या पाहिजेत, व्यवसाय म्हणून नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
