Saudi Arabia : अमेरिकेला मोठा धक्का, इस्त्रायल विरोधात सौदी अरेबिया करणार संरक्षण करार
Saudi Arabia : अमेरिकेचा मित्र राष्ट्र सौदी अरेबिया आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने अमेरिकेला मध्य -पूर्वेच्या राजकारणात मोठा
Saudi Arabia : अमेरिकेचा मित्र राष्ट्र सौदी अरेबिया आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याने अमेरिकेला मध्य -पूर्वेच्या राजकारणात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया एका अशा संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहे, जो इस्त्रायल आणि अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान एका संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहेत. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ रियाधमध्ये या लष्करी करारावर स्वाक्षरी करणार आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर (Asim Munir) यांच्यासमवेत तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रियाधला (Saudi Arabia) पोहोचले आहेत. या करारात प्रामुख्याने संरक्षण सहकार्य, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, सागरी सुरक्षा, संयुक्त लष्करी सराव आणि प्रादेशिक संकटांचा सामना करण्यासाठी धोरणे आखणे यांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत अधिकृत मसुदा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियावर अमेरिका (Donald Trump) इस्त्रायलशी संबंध सामान्य करण्यासाठी मोठा दबाव टाकत आहे मात्र गाझा युद्ध आणि मध्य पूर्वेतील व्यापक संकट पाहता, सौदी अरेबिया आता सावधगिरीने पावले उचलत आहे. अलीकडेच अमेरिकेने असेही संकेत दिले होते की, सौदी अरेबियासोबत प्रस्तावित नागरी अणु सहकार्य हे इस्रायलशी संबंध सामान्य करण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीशी जोडले जाईल.
आज ‘या’ 4 राशींच्या संपत्तीत होणार वाढ; जाणून घ्या सर्व
अब्राहम करार
अब्राहम करार हा 2020 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेला एक राजनैतिक करार आहे. इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील अनेक दशकांपासून चाललेला तणाव कमी करणे आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे हा या कराराचा उद्देश होता. या करारांतर्गत संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि बहरीन यांनी सर्वप्रथम इस्रायलला मान्यता दिली त्यानंतर मोरोक्को आणि सुदान यांनीही मान्यता दिली. सौदी अरेबियानेही या करारात सामील व्हावे आणि इस्रायलशी अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत, अशी अमेरिकेची इच्छा आहे.