Tukaram Mundhe On FDA Employees : … तर राजीनामा द्या अन् घरी जा; तुकाराम मुंढेंचा कर्मचाऱ्यांना इशारा

Tukaram Mundhe On FDA Employees : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून

Tukaram Mundhe On FDA Employees

Tukaram Mundhe On FDA Employees : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार करणाऱ्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे असं माध्यमांशी बोलताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अन्न व औषधे प्रशासनाच्या संभाजीनगर (Sambhajinagar) येथे असणाऱ्या प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवारी -रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश आणि रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण तसेच त्यामुळे नमुन्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली होती. आता यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

लॅबची सेवा ही 24 तास चालणारी  

माध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात मंत्री महोदयांकडे तक्रार केली आहे की, त्यांना सुट्टी दिली जात नाही. अनेक तास काम करावं लागतं आहे. त्यांची पहिली मागणी आहे की, त्यांना इतर कार्यालयांप्रमाणे 10 ते 6 प्रमाणे ट्रिटमेंट द्यावी मात्र लॅब हे कार्यालय नाही. लॅबची सेवा ही 24 तास चालणारी संस्था असते. इतर शासकीय कार्यालयात वेळ फिक्स असतो पण लॅबमध्ये तसं नसते. लॅब ही 24 तास चालू ठेवायची असते. 8  तास नाही. पण याचा अर्थ असा नाही की, कर्मचाऱ्यांना 24 तास काम करावं. त्यांना 8 तासच काम आपण लावतो फक्त ते शिफ्टमध्ये आहे असं तुकाराम मुंढे म्हणाले.

पुढे बोलताना तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) म्हणाले की, प्रत्येकजण एकच शिफ्ट करणार, दिवसात दोन शिफ्ट नाही. आठवड्यात 48 तासांच्यावर आपण त्यांना काम लावत नाही. आयएलओच्या नियमांच्या वर कुणीही त्यांना काम देत नाही. एक दिवस सार्वजनिक सुट्टी आपण देतो. अजून आपण 24 तास 7 दिवस काम सुरु केलेले नाही. आता फक्त दोन शिफ्टमध्ये सहा दिवस काम सुरु केले आहे. गरज पडली तर 24 तासासुद्धा आपण लॅब सुरु करावी लागेल आणि पुढच्या काही दिवसांत ते सुरु होईलच अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

Gen Z साठी CM फडणवीसांचे 9 महत्त्वाचे निर्णय, ठरणार गेमचेंजर

तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली त्यांची पहिली मागणी अत्यंत चुकीची असल्याने ती पूर्ण होऊ शकत नाही. 10 ते 6 या वेळेत त्यांना ऑफिस देऊ शकत नाही. आठवड्यात त्यांना एक सुट्टी आम्ही देतोय.  यामुळे त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो पुढच्या काळात दूर करु. आता तिथे व्यवस्थित काम सुरु आहे. त्यांना सांगितलं आहे की, या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे. ज्यांना शालन नियमांनुसार काम करायचं नाही ते राजीनामा देऊन जाऊ शकतात असा इशारा देखील तुकाराम मुंढे यांनी संभाजीनगर शहरातील प्रयोगशाळेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे.

follow us