Midterm Election : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची पीछेहाट
Midterm Election : अमेरिकेत मंगळवारी मिडटर्म निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आता या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे.
Midterm Election : अमेरिकेत मंगळवारी मिडटर्म निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आता या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. या निकालाता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी पक्षाचे उमेदवार पराभव होताना दिसत आहे. इराण युद्ध आणि मोठ्या प्रमाणात वाढणारी महागाई विरोधात अमेरिकेत मतदान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
‘डिसीजन डेस्क एचक्यू’ (Decision Desk HQ) च्या अहवालानुसार, जॉर्जियामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर जॉन ओसॉफ विजयी झाले आहेत. ओसॉफ यांनी यापूर्वी ट्रम्प यांच्यावर राष्ट्राध्यक्षपदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचा आरोप केला होता. 26 पैकी 17 जागांवर ट्रम्पविरोधी डेमोक्रॅट्सचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला 9 जागांवर विजय मिळाला आहे. याचबरोबर सिनेटमध्येही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट होताना दिसत आहे. सिनेटच्या 100 पैकी 33 जागी निवडणूक झाली असून सिनेटच्या सातही जागांवर डेमोक्रेटीक्सचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे दक्षिण कॅरोलिना, फ्लोरिडा, न्यू हॅम्पशायर, व्हर्जिनिया आणि केंटकीमध्येही मतदान पूर्ण झाले असून, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोणाच्या हातात सत्ता ?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो आणि या कालावधीच्या अगदी मध्यभागी मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. जरी यात राष्ट्राध्यक्षपद धोक्यात नसले, तरी या निवडणुकांमधून अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर कोणत्या पक्षाचे नियंत्रण असेल, हे ठरते. सध्याच्या निवडणुकीत ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’च्या (प्रतिनिधी सभा) सर्व 435 जागा आणि सिनेटच्या 100 पैकी 33 जागांसाठी मतदान झाले आहे. याव्यतिरिक्त, 36 राज्यांमध्ये गव्हर्नरपदासाठीही निवडणुका होत आहेत.
रिपब्लिकन पक्ष काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमधील आपले अल्प बहुमत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर डेमोक्रॅटिक पक्ष किमान एका किंवा दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवण्याचे ध्येय ठेवून आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष दोन्ही सभागृहांवर नियंत्रण राखून आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे 53 जागा, डेमोक्रॅटिक पक्षाकडे 47 जागा आणि अपक्षांकडे 2 जागा आहेत. ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये रिपब्लिकन पक्षाकडे 218 जागा, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे 214 जागा आहेत.
75 टक्के लोक असमाधानी
‘द वोटर पोल’ (The Voter Poll) च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकन मतदारांपैकी सुमारे तीन चतुर्थांश म्हणजेच 75 टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली देश ज्या दिशेने जात आहे, त्याबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, 10 पैकी जवळपास 6 मतदार वाढत्या किमती आणि महागाईसाठी प्रामुख्याने ट्रम्प यांच्या धोरणांना जबाबदार धरतात.
सिंह राशीमध्ये गुरू, चंद्र अन् केतूची युती; तूळ राशीसह ‘या’ 5 राशींना फायदा
ट्रम्प यांची धमकी
अंतिम निकाल येण्यापूर्वीच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या ‘व्हेटो’ (नकारधिकार) अधिकाराचा वापर करण्याची धमकी दिली आहे. ‘सीबीएस न्यूज’ (CBS News) ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, जर डेमोक्रॅट्सनी ‘हाऊस’ किंवा ‘सिनेट’ (वरिष्ठ सभागृह) मध्ये बहुमत मिळवले, तर ते स्वतःला “मिस्टर व्हेटो” (Mr. Veto) म्हणून सिद्ध करतील. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते आपला अजेंडा पुढे रेटणे सुरूच ठेवणार आहेत.