भुजबळ, मुश्रीफ वगळता बाकी नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला…रोहित पवारांचा गौप्यस्फोट

छगन भुजबळ, हसन मुश्रीफ सोडून बाकीच्या नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Mla Rohit Pawar

Mla Rohit Pawar : छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे मोठे नेते सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला हे दादांनी मला स्वतः सांगितल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी जय पवार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. काका पुतण्यामध्ये भाजपने वाद लावला आहे. आता तसच दोन भावांमध्ये देखील भाजप वाद लावत असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ सोडून बाकीचे नेते दोन भावांमध्ये वाद निर्माण करत आहेत असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले. पार्थ आणि नेत्यांमध्ये संभाषण नसल्यामुळं, पार्थ आणि सुनेत्राकाकींचा कंट्रोल काढला जाईल. एक नेते दिल्लीत आहेत, त्यांना आता अर्थ खात हवं आहे, असा एक नेता आहे जो मंत्री होता पण आता त्यांना परत मंत्री व्हायचं आहे असे रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.

दुर्दैवाने हे काल गेलेले अजितदादांच्या न्यायाची मागणी करुन आले असते तर बरं झालं असतं असेही रोहित पवार म्हणाले आहेत. मी पार्थ पवार आणि जय पवार आणि सुनेत्रा काकी यांना नातेवाईक म्हणून अवगत करत आहे की, भाजप आणि तुमच्या जवळच्या नेत्यांची खेळी तुम्हाला समजून घ्यावी लागेल असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. तर भुजबळ आणि मुश्रीफ यांना समजून घेतलं पाहिजे. अजितदादांचा पक्ष दादा होते म्हणून सत्तेत आला. दादा गेल्यावर पार्थला पद मिळालं पण जवळच्या लोकांपासून काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आमचा विरोध असायचे कारण नाही, ते जर भाजप सोडून आमच्याकडे येत असतील तर आम्ही विरोध कशाला करु. मोठ्या पवारांनी कायम भाजपच्या धोरणाला विरोध केला आहे. त्यात सुप्रियाताईंनी विरोध केला. त्यामुळं आम्ही काही त्यांच्या बरोबर नाही. पण सध्या दोन भावांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत, ते विचारांच्या विरोधात जाणार नाहीत. आम्ही देखील भाजपचा विरोध करत आहोत. पण जर ते भाजपचा विरोध करणार असतील तर आम्ही त्यांना सोबत घेऊ, पण जर ते विरोध करणार नसतील भाजपचा तर मग आम्ही त्यांचा विरोध करु. जे विरोधात आहेत त्यांनी विरोधी पक्षातील नेता असल्यासारखं लढावं असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.

follow us