व्यापार युद्ध भडकणार! अमेरिकेकडून चीनवर मोठा टॅरिफ बॉम्ब; 9 एप्रिलपासून 104 टक्के आयात शुल्क

US drop on China 104 percent import duty from April 9 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे.
भारत न तो झुकने वाला और न ही रुकने वाला; वक्फ कायदा लागू होताच मोदींचा इशारा
त्यात आता अमेरिकेकडून चीनवर आणखी मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात आला आहे. ज्यामधून जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच चीनवर 34% टॅरिफ लादलेल्या अमेरिकेने आता चीनवर पन्नास टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. तसेच युरोपीय संघाने देखील 25% टॅरिफचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे आता चीनवर 104 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. ज्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती देखील थेट प्रति बॅरल 60 डॉलरवर आले आहेत. ज्यामुळे जग मंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. तसेच व्यापारी युद्ध भडकण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता 90 दिवसांसाठी सर्व देशांवरील टॅरिफ कर थांबवण्याचा विचार केला आहे. मात्र व्हाईट हाऊसकडून अद्याप या बातमीची पुष्टी करण्यात आलेली नाही. क्या पॅरिस धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे.
जगाला झटका देणाऱ्या ट्रम्पकडून दिलासा! ब्राझीलसह ‘या’ देशांवरील टॅरिफ घेतला मागे
दोन आठवड्यांपूर्वी वीस टक्के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे आता चीनच्या वस्तूंवर अमेरिकेने 54 टक्के कर लावला आहे. त्यामुळे चीनच्या वस्तू अमेरिकेत महाग होणार आहे. त्याचा फटका चीनच्या उत्पादनाला बसणार आहे. आता चीनने ही अमेरिकेचे (America) टॅरिफ हत्यार त्यांच्यावर उगरले आहे. चीनने अमेरिकेवर 34 टक्के आयात शुल्क लादले आहे. या निर्णयापूर्वी गुरुवारी या आयात शुल्क युद्धामुळे अमेरिकेचे बाजार जोरदार कोसळले आहेत. त्यात आणखी घसरण होऊन अमेरिकेचा शेअर बाजारात मंदीचा धोका आहे.