टॅरिफ पे टॅरीफ सुरूच! चीनकडून अमेरिकेला 125 टक्के कर लादूनच उत्तर…

टॅरिफ पे टॅरीफ सुरूच! चीनकडून अमेरिकेला 125 टक्के कर लादूनच उत्तर…

China Answered America by Tarrif increase for 125 percent : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. त्यात एक दिलासा म्हणून अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफमध्ये 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनवर अमेरिकेकडून 145 टक्के कर लादण्यात आला आहे. त्याला उत्तर देत चीनने देखील अमेरिकेवर 125 टक्के कर लादला आहे.

Maruti Eeco 6-सीटर लाँच, भन्नाट फीचर्स, 6 एअरबॅग्ज अन् किंमत फक्त…

तसेच या परिस्थितीवर चीनने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी लोकांना जास्तीत जास्त खर्च करण्यास प्रोत्साहित करण्यास सुरू केले आहे. जेणे करून निर्यातीमध्ये होणारे नुकसान भरून निघेल. तसेच चीनकडून अमेरिकेवर देखील 125 टक्के कर लादून उत्तर दिलं आहे. त्यानंतर चीनकडून अमेरिकेची तक्रार जागतिक व्यापार संघटनेकडे केली आहे.

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरची कारागृहातून सुटका; विमानातून मुंबईला रवाना

टॅरिफ धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे. अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते. ही अशी धमकी आहे. जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही.

स्टॅलिनसारखी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली असती तर…कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला मोठा खुलासा

तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. चीनने अमेरिकेला वाटाघाटीद्वारे त्यांचे एकतर्फी शुल्क उपाय ताबडतोब काढून टाकण्याची विनंती केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube