मोठी बातमी! कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद
Commercial Gas : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तात्पुरता व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी
Commercial Gas : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तात्पुरता व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी दिली आहे. याच बरोबर गॅसचा अवैद्य साठा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हॉटेल्स चालकांनी गॅसचे नियोजन करुन जपून वापरावा लवकरच गॅस तुटवड्याची (Commercial Gas) परिस्थिती लवकरच नियंत्रणात करण्यात येणार असल्याची देखील माहिती कोल्हापूर जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके (Amol Yedke) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात व्यावसायिक गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून गॅसचा अवैध साठा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅससोबत रुग्णालय, निवासी शाळा, शैक्षणिक संस्थांना लागणारा गॅस पुरवठा सुरळीत असल्याची देखील माहिती जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी दिलीय.
अमेरिका (America) , इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा आजचा बारावा दिवस असल्याने या युद्धाचा मोठा फटका आता भारताला बसताना दिसत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाहीतर देशातील अनेक भागात गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पुढील दोन – तीन दिवसात बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
…म्हणून भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी; अमेरिकेने सांगितले धक्कादायक कारण-
तर मुंबई शहरात देखील गॅस पुरवठा सामान्य झाला नाही तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद पडणार असल्याचा दावा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी केलाय.
