Summer Tips : उन्हाळ्यात झपाट्याने वाढतयं वीज बिल? फक्त 5 ट्रिक्स ज्यामुळे लागेल ‘ब्रेक’
How To Reduce Electricity Bills In Summer कडाक्याची थंडी संपून आता उन्हाच्या झळांनी शरिराची लाही-लाही होण्यास सुरूवात झाली आहे.
How To Reduce Electricity Bills In Summer : कडाक्याची थंडी संपून आता उन्हाच्या झळांनी शरिराची लाही-लाही होण्यास सुरूवात झाली आहे. उन्हाची तीव्रता कमी व्हावी आणि उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घराघरांमध्ये आता फॅन, कुलर आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. दिवसभराच्या वापरामुळे महिन्याच्या शेवटी भरमसाठ आलेल्या बिलाचा आकडा बघून शॉक लागतो. पण, पाच अशा ट्रिक्स आहेत ज्यामुळे कडाक्याच्या उन्हात थंडावाही मिळेल आणि वाढत्या बिलाला ब्रेकही लागले. या ट्रिक्स नेमक्या काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
Explainer : कंपन्या, स्मशानभूमी बंद; युद्धामुळे महाग झालेल्या गॅसने देशासह पुण्याचा बिघडवला ‘खेळ’
घरातील एसीचा वापर योग्यरित्या आवश्यक
जर, तुमच्या घरात एअर कंडिशनर असेल तर, त्याच्या सेटिंग्स योग्य पद्धतीने राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा एसीचे तापमान 18 अंश सेल्सिअसवर ठेवले जाते ज्यामुळे विजेचा वापर लक्षणीयरीत्या वाढतो. तज्ज्ञांच्या मते एसीचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे. फक्त एक अंश तापमान वाढवल्याने देखील 6 टक्के वीज वाचू शकते असे तज्ञ्जांचे मत आहे. याव्यतिरिक्त, एसीसोबत पंखा चालवल्याने खोली कमी वेळात थंड होते. जेव्हा पंखा मंद गतीने चालतो तेव्हा थंड हवा खोलीत लवकर पसरते. यामुळे एसीवरील ताण कमी होतो आणि वीजेचा वापर कमी होतो.
एसीचा एअर फिल्टर नियमितपणे अस्वच्छ असेल तर, मोटर अधिक वेगाने काम करते ज्यामुळे विजेचा अतिरिक्त वापर होतो. त्यामुळे साधारण 15 दिवसांनी फिल्टर स्वच्छ करावे.
नैसर्गिक थंडाव्याचा प्रयत्न करा
तुमचे घर थंड ठेवण्यासाठी फक्त विद्युत उपकरणांवर अवलंबून राहणे आवश्यक नाही. काही नैसर्गिक पद्धतीनेदेखील खोलीचे तापमान कमी करण्यास मदत होते. घरातील पडदे बंद ठेवल्याने घरातील तापमानात घट होते. गडद रंगाचे पडदे वापरल्याने विशेषतः दुपारी खोली थंड राहण्यास मदत होऊ शकते. संध्याकाळच्या सुमारास खिडक्या उघड्या ठेवल्याने थंड हवा येते, ज्यामुळे रात्री एसी चालवण्याची गरज कमी होते.
International Women’s Day Special : घर अन् काम मॅनेज कसे कारायचे? वाचा खास Tips
वापरात नसलेली उपकरणे बंद करा
टीव्ही, लॅपटॉप चार्जर आणि मायक्रोवेव्ह सारखी उपकरणे स्टँडबाय मोडमध्ये देखील वीज वापरत राहतात. त्यामुळे वापर नसताना ही उपकरणे बंद करा. कारण अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद असतानाही वीज वापरतात.
रेफ्रिजरेटरची योग्य सेटिंग महत्त्वाची
रेफ्रिजरेटर हे घरातील सर्वात जास्त काळ टिकणाऱ्या उपकरणांपैकी एक आहे. त्यामुळे वीज वाचवण्यासाठी त्याचा योग्य वापर देखील महत्त्वाचा आहे. रेफ्रिजरेटर भिंतीपासून कमीत कमी 6 इंच अंतरावर ठेवावा. जेणेकरून मागून येणारी गरम हवा सहजपणे बाहेर जाऊ शकेल.
उन्हाळ्यात रेफ्रिजरेटर समर मोडवर ठेवणे देखील फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, रेफ्रिजरेटरचा दरवाजा वारंवार उघडणे टाळावे कारण, यामुळे आतील तापमान वाढते आणि रेफ्रिजरेटर पुन्हा थंड करण्यासाठी जास्त वीज खर्च करावी लागते. गरम अन्न थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने देखील विजेचा वापर वाढतो.
E20 Petrol : 1 एप्रिलपासून तुमची गाडी E20 पेट्रोलवर धावणार; नेमकं E20 काय, किती असणार किंमत?
एलईडी बल्बचा वापर
अनेक घरांमध्ये अजूनही अतिरिक्त वीज वापरणाऱ्या फिलामेंट बल्ब किंवा ट्यूबलाईट वापर होतो. त्याऐवजी एलईडी बल्ब वापरल्याने वीज वापर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. एलईडी बल्ब कमी वीज वापरून जास्त प्रकाश देतात आणि जास्त काळ टिकतात. म्हणूनच, तुमच्या घरात एलईडी दिवे वापरणे हा वीज वाचवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
