Maruti Eeco 6-सीटर लाँच, भन्नाट फीचर्स, 6 एअरबॅग्ज अन् किंमत फक्त…

Maruti Eeco 6-सीटर लाँच, भन्नाट फीचर्स, 6 एअरबॅग्ज अन् किंमत फक्त…

Maruti Eeco : देशातील बाजारात गेल्या काही वर्षांपासून 7 सीटर कार्सची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे. सध्या भारतीय बाजारात भन्नाट फिचर्ससह एकापेक्षा एक 7 सीटर कार्स लॉन्च करण्यात आले आहे. तर आता या महागाईत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी जबरदस्त फिचर्स आणि दमदार इंजिनसह देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) बाजारात नवीन 6 सीटर कार (Maruti Eeco) लॉन्च केली आहे. ज्याची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे.

भारतीय बाजारात मारुतीने 7 सीटर मारुती इको बंद करुन नवीन 6 सीटर मारुती इको लॉन्च केली आहे. ज्याची किंमत देखील मारुतीने खूपच कमी ठेवली आहे. या कारमध्ये मारुतीने कॅप्टन सीट देखील दिली आहे. तसेच या कारमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज देण्यात आले आहे. 6 एअरबॅग्जमुळे या कारची विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किंमत किती आहे?

मारुती इकोची किंमत मुंबईत 6.41 लाख ते 7.48 लाख रुपयांच्या दरम्यान आहे मात्र मारुतीने लॉन्च केलेल्या नवीन 6 सीटरची किंमत 26000 रुपये जास्त असणार आहे. या कारची किंमत मुंबईत 7 लाख रुपये (ऑन रोड) असणार आहे. या कारमध्ये पूर्वीसारखाच इंजिन देण्यात आला आहे. मारुती इकोमध्ये 1.2 -लिटर एनए पेट्रोल इंजिन देईल जे 80 बीएचपी आणि 104 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

राज्यात ठोकशाही सुरु झाली का? भिक्षुक मृत्यू प्रकरणावरून रोहित पवार संतापले

तर दुसरीकडे या कारच्या केबिनमध्ये रिक्लाइनिंग फ्रंट सीट, ड्युअल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), स्लाइडिंग डोअर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीअरिंग व्हील आणि हीटर अशी भन्नाट फीचर्स देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube