इलेक्ट्रिक हायब्रिड सिस्टम अन् फर्स्ट क्लास फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 2.15 लाखांचा डिस्काउंट

  • Written By: Published:
इलेक्ट्रिक हायब्रिड सिस्टम अन् फर्स्ट क्लास फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 2.15 लाखांचा डिस्काउंट

Maruti Invicto Discount : देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आपल्या शादार एमपीव्ही कारवर (MPV Car) बंपर डिस्काउंट देत आहे. जर तुम्ही या महिन्यात नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कमी किंमतीमध्ये शानदार फिचर्ससह तुम्हाला नवीन कार खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या एमपीव्ही इन्व्हिक्टोवर (Maruti Invicto) या महिन्यात डिस्काउंट देत आहे. कंपनी या कारच्या 2024 आणि 2025 च्या मॉडेलवर डिस्काउंट देत आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्हाला ही दमदार कार तीन व्हेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे. तुम्ही ही कार स्ट्रँग हायब्रिड झेटा प्लस 7एस, स्ट्रॉंग हायब्रिड झेटा प्लस 8एस आणि स्ट्रॉंग हायब्रिड अल्फा प्लस 7एस या व्हेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे.

कंपनी इन्व्हिक्टो MY24 वर 2.15 लाख रुपये आणि MY25 वर 1.15 लाख रुपयांची सूट देत आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 25.21 लाख रुपये आहे.

Maruti Invicto फिचर्स

कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये एकापेक्षा एक शानदार फिचर्स दिले आहे. या कारमध्ये इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड सिस्टमसह 2.0 -लिटर टीएनजीए इंजिन देण्यात आले आहे. ते 183hp पॉवर आणि 1250Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 9.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. याचबरोबर एका लिटरमध्ये ही कार 23.24 किमी पर्यंत मायलेज देते.

या कारमध्ये मस्क्युलर क्लॅमशेल बोनेट, डीआरएलसह आकर्षक एलईडी हेडलाइट्स, हेक्सागनल ग्रिल, एअर डॅम आणि सिल्व्हर स्किड प्लेट्स देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या रोमध्ये कॅप्टन सीट्स, साइड फोल्डेबल टेबल्स आणि थर्ड रोमध्ये वन-टच वॉक-इन स्लाइड, मल्टी-झोन तापमान सेटिंग्ज देखील देण्यात आले आहे.

केबिनमध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, लेदर अपहोल्स्ट्रीसह पॉवर्ड ऑटोमन सीट्स, इंटिग्रेटेड मूड लाइटिंगसह पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

तर सेफ्टीसाठी नेक्स्ट-जनरेशन सुझुकी कनेक्टसह यात सहा एअरबॅग्जची सुरक्षा देण्यात आली आहे. या कारची लांबी 4755 मिमी, रुंदी 1850 मिमी आणि उंची 1795 मिमी आहे.

शिर्डी दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई…

डिस्क्लेमर: डिस्काउंट ऑफर तुमच्या शहरात किंवा डीलरनुसार बदलू शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या