Maruti Grand Vitara 7 Seater ‘या’ दिवशी बाजारात होणार लाँच ; जाणून घ्या फिचर्ससह सर्वकाही…

  • Written By: Published:
Maruti Grand Vitara 7 Seater ‘या’ दिवशी बाजारात होणार लाँच ; जाणून घ्या फिचर्ससह सर्वकाही…

Maruti Grand Vitara 7 Seater : देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकी लवकरच 7 सीटर कार सेंगमेंटमध्ये मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मारुतीकडून पुढील काही दिवसात नवीन 7 सीटर कार लॉच करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीकडून जोरदार तयारी देखील करण्यात येत आहे. नुकतंच मारुतीकडून लोकप्रिय कार ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara 7 Seater) या कारच्या 7 सीटर व्हर्जनची टेस्टींग करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात बाजारात 7 सीटर ग्रँड विटारा लॉच होऊ शकते. मात्र अद्याप कंपनीकडून याबाबात कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. कंपनीकडून या 7 सीटर कारची टेस्टींग देखील सुरु करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही 7 सीटर कार कंपनीच्या प्लांटच्या बाहेर दिसली आहे. दिसणारे युनिट नियमित ग्रँड विटारापेक्षा वेगळ्या आकाराचे होते, ज्यामुळे ते सहज ओळखता आले. माहितीनुसार,या कारची व्हीलबेस सुमारे 2600 मिमी राहू शकतो.

शक्तिशाली इंजिन

या कारच्या इंजिनमध्ये कंपनीकडून कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. या कारमध्ये देखील सध्याच्या कारप्रमाणेच 1.5 -लिटर नेचुरल एस्पिरेटेड माइल्ड हायब्रिड इंजिन असणार आहे. जे 103 पीएसची शक्ती आणि 136.8 न्यूटन मीटरचा टॉर्क देणार आहे. याचबरोबर या कारमध्ये स्ट्रँग हायब्रिड इंजिनचा पर्याय देण्यात येणार आहे. जे 115 पीएसची शक्ती आणि 141 न्यूटन मीटरचा टॉर्क देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

फिचर्स

या 7 सीटर कारमध्ये अपडेटेड इंटीरियर, मोठी आणि चांगली इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच आताच्या कारमध्ये असणाऱ्या सर्व फिचर्स देखील असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा 18 फेब्रुवारीला होणार पदग्रहण सोहळा

मात्र ही कार कधी लॉच होणार याबाबात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या कारला Y17 असं सांकेतिक नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार लॉच होऊ शकते. भारतीय बाजारात ही कार महिंद्रा स्कॉर्पिओ, एमजी हेक्टर, टाटा सफारी, ह्युंदाई अल्काझार सारख्या कार्संना टक्कर देणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube