MG Hector वर तब्बल 2.40 लाखांचा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

  • Written By: Published:
MG Hector वर तब्बल 2.40 लाखांचा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

MG Hector : जर तुम्ही देखील या महिन्यात किंवा मार्च महिन्यात स्वतःसाठी नवीन एसयूव्ही कार (SUV Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी ऑटो कंपनी एमजीने आपल्या लोकप्रिय कारवर सर्वात मोठी सुट दिली आहे.

कंपनीने भारतीय बाजारात भन्नाट फिचर्ससह येणारी एमजी हेक्टर (MG Hector) डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किंमतीमध्ये एक दमदार कार घरी आणू शकतात. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या महिन्यात या कारवर 2.40 लाखांचा डिस्काउंट देत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर 31 मार्चपर्यंत असणार आहे. या ऑफरच्या अधिक माहितीसाठी तुम्ही एमजी डीलरशी संपर्क करु शकतात. याच बरोबर कंपनी रोड टॅक्सवर 50% सूट देत असल्याचा दावा देखील मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे.

MG Hector इंजिन

कंपनीने या कारमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 लिटर टर्बो डिझेल इंजिन पर्याय दिले आहे. 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येते तर डिझेल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे.

MG Hector फिचर्स

MG Hector मध्ये कंपनीने 14 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. तसेच या कारमध्ये 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स देखील उपलब्ध आहे. याचबरोबर या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, लेव्हल-2 एडीएएस, डिस्क ब्रेक, अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले, वायरलेस चार्जर, हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि 6 एअरबॅग्ज एअरबॅग्ज, हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा सारखी फिचर्स देण्यात आली आहे. भारतीय बाजारात ही भन्नाट कार 5/6/7 सीटर व्हेरीयंटमध्ये उपलब्ध आहे.

मोनिका राजळे, राम कदम यांना महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांमध्ये स्थान, कोणाकोणाची लागली वर्णी ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube