इराण मीडल ईस्टचा लूजर, आज होऊ शकतो सर्वात मोठा हमला… डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
Donald Trump अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांच्या दबावाखाली इराणने शेजारील देशांची माफी मागितली आहे, असा दावा त्यांनी केला.
Trump warns today Iran will be hit very hard says it is loser of the Middle East : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणवर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची घोषणा केली आहे. तसेच इराण मीडल ईस्टमधला लूजर असल्याचे म्हणत डिवचलं आहे. जर इराणने शरणागती पत्करली नाही तर, आज मोठा हल्ला केला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणमधील काही भाग आणि लोक ज्यांना आतापर्यंत लक्ष्य केले गेले नाही ते देखील लक्ष्य बनू शकतात, असेही ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवर लिहिले आहे. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांच्या दबावाखाली इराणने शेजारील देशांची माफी मागितली असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
Iran Israel War : इराण आणि इस्रायलमधील युद्ध 12 मार्च रोजी संपणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
ट्रम्प यांनी पोस्ट नेमकी काय?
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर लिहिले आहे की, “इराणने दारुण पराभवाचा सामना करत शेजारील राष्ट्रांकडे शरणागती पत्करली आहे, त्याने मध्यपूर्वेतील आपल्या शेजाऱ्यांकडे माफी मागितली आहे आणि पुन्हा त्यांच्यावर हल्ला न करण्याचे वचन दिले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून हे वचन देण्यात आल्याचे ते म्हणाले. इराण मध्य पूर्वेवर कब्जा करून राज्य करू इच्छित होता. हजारो वर्षांत पहिल्यांदाच इराणने आपल्या शेजारील मध्य पूर्वेतील देशांकडून पराभव पत्करला आहे.

“धन्यवाद, अध्यक्ष ट्रम्प. त्यावर तुमचे स्वागत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराण आता दादा राहिलेला नाही तर, मध्यपूर्वेतील पराभूत देश झाला आहे. जोपर्यंत इराण शरणागती पत्करल्याशिवाय किंवा पूर्णपणे कोसळेपर्यंत तसाच राहिल. आज इराणवर मोठा हल्ला केला जाईल! इराणच्या वाईट वर्तनामुळे, ज्या क्षेत्रांवर आणि लोकांवर आतापर्यंत हल्ला झाला नाही ते देखील आता लक्ष्य बनू शकतात. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! अध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प . Trump warns today Iran will be hit very hard says it is loser of the Middle East
