BYD Sealion 7 पावरफुल बॅटरी अन् 567 किमीची रेंजसह 17 फेब्रुवारी रोजी होणार लाँच

  • Written By: Published:
BYD Sealion 7 पावरफुल बॅटरी अन् 567 किमीची रेंजसह 17 फेब्रुवारी रोजी होणार लाँच

BYD Sealion 7 : भारतीय बाजारात चिनी ऑटो कंपनी BYD पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. कंपनी भारतीय बाजारात आपली आणखी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात कंपनी 17 फेब्रुवारी रोजी BYD Sealion 7 नावाने नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच करणार आहे.

नुकतंच झालेल्या इंडिया मोबिलिटी अंतर्गत ऑटो एक्स्पो 2025 मध्ये (Auto Expo 2025) कंपनीकडून ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्यात आली होती.

BYD Sealion 7 फीचर्स

कंपनीकडून BYD Sealion 7 मध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीकडून या कारमध्ये 12 स्पीकर्स, वायरलेस फोन चार्जर, वॉटर ड्रॉप टेल लॅम्प, 15.6 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, नप्पा लेदर सीट, 128 रंगांचे अँबियंट लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले अशी अनेक फीचर्स देण्यात आले आहे.

BYD Sealion 7 बॅटरी आणि रेंज

तर दुसरीकडे कंपनीने या कारमध्ये 82.56 किलोवॅट प्रति तास क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही कार फक्त प्रीमियम आणि परफॉर्मन्स व्हेरिएंटमध्ये आणण्यात आली आहे. कारमध्ये 390 किलोवॅटची शक्ती आणि 690 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. कारमध्ये बसवलेल्या मोटरमुळे कार फक्त 4.5 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते. एका चार्जमध्ये ते जास्तीत जास्त 567 किलोमीटरची रेंज मिळवते. कंपनी कारसोबत 7 किलोवॅट क्षमतेचा चार्जर देणार आहे.

BYD Sealion 7 किंमत  

कंपनीकडून अद्याप या कारची किंमत किती असणार आहे. याबाबत कोणतीही माहिती कंपनीकडून शेअर करण्यात आलेली नाही. कंपनीने या कारची बुकिंग 18 जानेवारी 2025 पासून सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 17 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केल्या जाणार आहे. ही एसयूव्ही 70 हजार रुपयांना बुक करता येते. BYD Sealion 7 भारतीय बाजारात Hyundai Ioniq5, Kia EV6, BMW iX7 सारख्या इलेक्ट्रिक SUV ला टक्कर देणार आहे.

देशाला पुढे नेण्यासाठी युवाशक्ती ची आवश्यकता, दत्तात्रय भरणे यांचे मत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube