Auto Expo 2025 : क्लासिक फिचर्स अन् पावरफुल इंजिनसह देशात आली पहिली सीएनजी स्कूटर

  • Written By: Published:
Auto Expo 2025 : क्लासिक फिचर्स अन् पावरफुल इंजिनसह देशात आली पहिली सीएनजी स्कूटर

Jupiter CNG Scooter : भारतीय बाजारात वाढत असणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक (Electric) आणि सीएनजी (CNG) वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात सीएनजी बाईक (CNG Bike) लाँच करण्यात आली होती ज्याला बाजारात दमदार रेस्पॉस देखील मिळत आहे.

तर आता भारतीय बाजारात पहिली सीएनजी स्कूटर सादर करण्यात आली आहे. ज्युपिटर कंपनीने आज भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 (Auto Expo 2025) मध्ये देशाची पहिली सीएनजी स्कूटर सादर केली आहे. ज्युपिटर सीएनजी स्कूटर (Jupiter CNG Scooter) सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही पर्यायावर चालणार आहे.

Jupiter CNG Scooter डिझाइन

ज्युपिटर सीएनजी स्कूटरची डिझाइन ज्युपिटर 125 सीसी पेट्रोल स्कूटर सारखी करण्यात आली आहे. पण सीएनजी असल्याने या स्कूटरमध्ये काही विशेष बदल देखील करण्यात आले आहे. स्कूटरमध्ये 1.4 किलोची सीएनजी टाकी आणि 2 लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर एक किलो सीएनजीमध्ये 84 किमी मायलेज देऊ शकते.

तर सीएनजी आणि पेट्रोलसह 226 किमीपर्यंत ही स्कूटर धावू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तर या स्कूटरमध्ये ओबीडी2बी इंजिन देण्यात आले आहे. यात 125 सीसी बायो-फ्युएल इंजिन आहे. जे 600 आरपीएमवर 5.3 किलोवॅट पॉवर आणि 5500 आरपीएमवर 9.4 एनएम टॉर्क निर्माण करते.

Jupiter CNG Scooter फिचर्स

कंपनीने या स्कूटरमध्ये नवीन आणि स्मार्ट फीचर्स दिले आहे. ग्राहकांना या स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट्स, यूएसबी चार्जर, स्टँड कट-ऑफ आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स मिळणार आहे. कंपनीनुसार ही स्कूटर पर्यावरण आणि इंधन बचतीसाठी तयार करण्यात आले आहे.

Delhi Election 2025 : महिलांना मिळणार दरमहा 2500 रुपये अन् मोफत वीज-पाणी, भाजपकडून मोठी घोषणा

Jupiter CNG Scooter अपेक्षित किंमत

भारतीय बाजारात टीव्हीएस ज्युपिटर 125 पेट्रोल स्कूटरची किंमत 88,174 ते 99,015 रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, सीएनजी स्कूटरची किंमत देखील 90,000 ते 99,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube