राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सीचे भाडेदर अन् नियमावली जाहीर! जाणून घ्या अटी अन् शर्थी

State Transport Corporation ने राज्यातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

State Transport Corporation

State Transport Corporation rate fixed of Electric Two wheeler taxi : आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या दरम्यान राज्याच्या परिवहन मंडळाने राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली. कसे आहेत हे दर आणि त्यासाठी काय अटी घालून दिल्या गेल्या आहेत जाणून घेऊ…

इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सीचे भाडेदर निश्चित

महाराष्ट्र शासनानेमहाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 73 व 96 नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो तात्काळ लागू होणार आहे.

‘महाराष्ट्रावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर…’ संजय राऊतांनी थेट अजित पवारांचं नाव घेतलं

ठरवलेले भाडेदरइलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर 10.27 एवढे भाडे असणार आहे. त्यासाठी पहिला टप्पा 1.5 किमीसाठी प्राथमिक किमान भाडे 15 अनिवार्य असणार आहे. प्रवास कितीही छोटा असला तरी किमान 15 आकारले जाणार आहे.

तातडीने मदत द्या! पाथर्डीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; खासदार लंके, प्राजक्त तनपुरे यांची मागणी

त्याचबरोबर यासाठी शासनाने परवानाकार्यक्षेत्र देखील ठरवून दिले आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन कंपन्यांना प्राव्हिजनल लायसन्स दिले गेले आहे. यामध्ये मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि, मे. रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि, मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे. हा परवाना 30 दिवसांचा असून, त्यानंतर अंतिम परवाना घ्यावा लागेल.तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी मान्य करणे बंधनकारक असणार आहे.

जमिनी पाण्याखाली, जनावरं-गाड्या गेल्या वाहून! पावसाचा धोका पुन्हा वाढला, आज 33 जिल्ह्यांना अलर्ट

दरम्यान हे भाडेदर निश्चित करणे आणि त्यासाठी अटी शर्थी घालून देणे यामागे सरकारचे काही उद्देश आहेत. त्यामध्ये या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्करपर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळेल. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होईलप्रदूषण नियंत्रणास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

follow us