अजितदादांच्या विमान अपघातावर भुजबळांचं मोठ वक्तव्य; थेट नाव घेत केला दावा
अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, मी स्वतः घटनास्थळी गेलो, टेबल टॉप जागा होती.
आजवर अनेक नेते विमान अपघातामध्ये गेले, पण अजितदादांच्या (Baramati) अपघाताच्या रुपाने महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात झाला, त्यांची उणीव भरून काढणं शक्य नाही अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याही विमानाला अपघात झाला होता, पण असं कधी झालं नव्हतं असंही भुजबळ म्हणाले.
अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, “अजितदादांचा अपघात झाल्यावर मी स्वतः घटनास्थळी गेलो, टेबल टॉप जागा होती. ते विमान तिथे गेले कसे हा प्रश्न आहे. ते विमान घिरट्या घालत होते. काहीतरी गडबड आहे. रडार खराब झाले असावे किंवा इंजिनमध्ये बिघाड झाली असेल. याची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल. पण ही सोन्यासारख्या माणसे गेली त्याचे काय? तसंच, भुजबळ म्हणाले की, दादांनी आयुष्यभर त्रास सहन केला. लहानपणी वडील गेले. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं.
अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; थोरातांकडून बारामतीत पवार कुटुंबीयांचं सांत्वन
पवार साहेबांमुळे त्यांना कामाचा अनुभव मिळाला. दादा सकाळी 6 वाजल्यापासून काम करायचे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही एकत्रित काम केले. मागे एकदा सरकारची भूमिका नरमाईची वाटली. मी शिंदे मुख्यमंत्री असताना राजीनामा दिला, तेव्हा दादा बोलले कशाला राजीनामा देतात. तुम्हाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. अजितदादा आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने चालले. नाशिकवर दादांचे प्रेम होते. ते गेल्यानंतर काही गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत. पक्षासंबंधी सुनेत्रा ताईंना विचारले, त्याची संमती घेतली आणि एक मताने निर्णय घेतला. आमच्यापुढे दुसरे नाव नव्हतं.
त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुनेत्रा पवार यांचे नाव दिले. शपथविधीचा निर्णय लवकर झाला की उशिरा झाला यापेक्षा, योग्य निर्णय आहे की अयोग्य हे सागा. आता जे चर्चा करत होते त्यांनी सांगावे, यावर काय करायला हवं होतं? आम्हाला जे योग्य वाटले ते आम्ही केले. दादांच्या मार्गाने आम्ही चालणार, दादांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जाणार. दादांचं काम थांबणार नाही , त्यांची अपूर्ण कामं पूर्ण करू असा विश्वास छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
