Video : माझा दमदार अन् दिलदार मित्र मी गमावला; दादांच्या अकाली एक्झिटने फडणवीस भावूक…

Devendra Fadnavis On Ajit Pawar Death  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाला असून

  • Written By: Published:
Devendra Fadnavis On Ajit Pawar Death 

Devendra Fadnavis On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झालं असून राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते. मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पार्थ पवारसोबत माझे बोलणं झाले अशा गोष्टीवर मन विश्वासच ठेवत नाही. हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.

मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकी घटना काय?

आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये जाहीर सभा घेण्यासााठी जात होते. या सभेसाठी अजित पवार आज सकाळी मुंबईहून विमानाने बारामतीच्या दिशेने निघाले होते. मात्र लँडिंगच्या 45 सेकंदापूर्वी विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला आणि विमान शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

अजितदादा मनाने निर्मळ होते, मोठा भाऊ हरपल्याची मनात भावना; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

 

follow us