2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा कुणाला मिश्किल सवाल ?
Raj Thackeray: काही व्यासपीठही अशी असतात, ज्यावेळेस राजकीय मतभेद गाडून, सोडून व्यासपीठावर एकत्र यावे लागते.
Raj Thackeray on Devendra Fadnavis : व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत पार पाडले. या प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे, मंत्री आशिष शेलार हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी जोरदार फटकेबाजी केलीय.
राज ठाकरे यांनी बोलविले की मुख्यमंत्री येतात, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात म्हटले. तो धागा पकडून 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केलीय. त्यामुळे सभागृहात जोरदार हास्यकल्लोळ डाला. काही व्यासपीठही अशी असतात, ज्यावेळेस राजकीय मतभेद गाडून, सोडून व्यासपीठावर एकत्र यावे लागते. ते व्यासपीठ कलेचे असते, ते व्यासपीठ संगिताचे असते. ते व्यासपीठ कधी-कधी लग्नाचे असते, दुसऱ्यांच्या. परंतु असा प्रकारचे मतभेद, अशा टीका एकमेंकावर करित असतात. अशा प्रसंगी त्या गोष्टी बाजूला सोडून आहे. एका व्यासपीठावर येणे ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे.
मुंबईत व्यंगचित्रकारांचे दालन उभे राहिले आहे. अनेक व्यंगचित्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. आपल्या राज्यात व्यंगचित्रकार आहे. ही परंपरा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दालन करावे. चित्रकार, शिल्पकारांचे खूप मोठे दालन होणे आवश्यक आहे. मी एकादिवशी राष्ट्रपती भवनात गेलो होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एपीजी अब्दुल कलामांना भेटायला गेलो. मी जात असताना आतमधील पसेजमध्ये राष्ट्रपतींची पेटिंग होते. थांबून चित्र पाहिले आहे. जवळपास 80 टक्के चित्रकार महाराष्ट्रातील होते.