महिंद्राची इलेक्ट्रिक बाजारात धमाकेदार एंट्री, XEV 9e आणि BE 6e लाॅंच, किंमत आहे फक्त…

  • Written By: Published:
महिंद्राची इलेक्ट्रिक बाजारात धमाकेदार एंट्री, XEV 9e आणि BE 6e लाॅंच, किंमत आहे फक्त…

Mahindra XEV 9e And BE 6e Launch :  भारतीय इलेक्ट्रिक बाजारात महिंद्राने धमाकेदार एंट्री करत दोन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स लाँच केले आहे. कंपनीने बाजारात XEV 9e आणि BE 6e इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स लाँच केली आहे. या कारमध्ये ग्राहकांना भन्नाट फीचर्स आणि बेस्ट रेंज मिळणार असल्याचा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात BE 6e ची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपये आहे तर XEV 9e ची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपये आहे. कंपनी फेब्रुवारी 2025 मध्ये या कार्सची डिलीव्हरी करणार आहे.

Mahindra XEV 9e आणि BE 6e फीचर्स

कंपनीने दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्समध्ये फ्युचरिस्टिक केबिन डिझाइन आणि कंफर्टेबल सीट्स देण्यात आले आहे. तसेच  XEV 9E मध्ये 43-इंचाचा ट्रिपल स्क्रीन सेटअप देण्यात आले आहे.  ज्यामध्ये प्रवासी, ड्रायव्हर आणि सेंट्रल इन्फोटेनमेंट प्रदान करण्यात आले आहे. तसेच मनोरंजनसाठी Bring Your Own Device फिचर देण्यात आले आहे.

तर BE 6E मध्ये फक्त 12.3 इंच ड्युअल स्क्रीन सेटअप देण्यात आले आहे. याच दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 360 डिग्री कॅमेरा, ऑटो ॲडजस्टिंग हेडअप डिस्प्ले व्हिजन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, कनेक्टेड कार फीचर्स, 6 एअरबॅग्ज, 16 दशलक्ष रंग पर्यायांसह एंबिएंट लाइटिंग आणि ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टिम यांचा समावेश आहे.

XEV 9e आणि BE 6e लूक

कंपनीने दोन्ही एसयूव्ही  INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चरवर तयार करण्यात आले आहे. XEV 9e ची लांबी 4,789 mm आहे आणि ग्राउंड क्लीयरन्स 207 mm आहे. महिंद्राच्या या फ्लॅगशिप एसयूव्हीमध्ये 195 लीटरची फ्रंट स्पेस आणि 663 लीटरची बूट स्पेस आहे.  तर BE 6e ची लांबी 4,371 mm आहे आणि 455 लीटर बूट स्पेस आणि समोरच्या ट्रंकमध्ये 45 लिटर जागा आहे.  XEV 9E मध्ये स्लीक एरोडायनामिक कूप SUV डिझाइन आहे. तर त्रिकोणी हेडलॅम्प सेटअप, फ्लेर्ड व्हील आर्च, रुंद एलईडी लाइट बार आणि 19-इंच व्हील्स दिसतात. याच बरोबर BE 6E मध्ये इंटिग्रेटेड इन्व्हर्टेड एल-शेप डीआरएल, 20-इंच अलॉय व्हीलसह इतर फीचर्स आहेत.

XEV 9e आणि BE 6e: बॅटरी-पॉवर

कंपनीनुसार XEV 9e आणि BE 6e 59 kWh आणि 79 kWh बॅटरी पॅकमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच कंपनीकडून या कार्समध्ये LFP केमिस्ट्री असलेल्या बॅटरी आणि अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आले आहे. यामुळे 175 kW चार्जरच्या मदतीने कार फक्त 20 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज होते. तर दुसरीकडे XEV 9E आणि BE 6E चा 59kWh बॅटरी पॅक 231 HP ची पॉवर जनरेट करू शकते. 79 kWh बॅटरी पॅक 286 HP पॉवर आणि 380 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीनुसार, दोन्ही इलेक्ट्रिक कार्स  6.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग धरू शकतात.

जरांगेमुळेच माझं मताधिक्य कमी झालं, छगन भुजबळांची जाहीर कबुली

XEV 9e आणि BE 6e रेंज

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा BE 6E सिंगल चार्जमध्ये तब्बल 682 किमी रेंज देऊ शकते तर XEV 9E सिंगल चार्जमध्ये 656 किमी रेंज देऊ शकते. याच दोन्ही एसयूव्ही कार्समध्ये  लाइफटाइम बॅटरी वॉरंटी देण्यात आली असल्याची माहिती देखील कंपनीकडून देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube