बाजारात वाढणार गर्दी, लवकरच लाँच होणार ‘ह्या’ 5 सर्वात भारी इलेक्ट्रिक कार्स
Upcoming EVs In India: भारतीय बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार्सची (EV Cars) मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात दमदार फीचर्स आणि हाय रेंजसह नवीन नवीन इलेक्ट्रिक कार्स (Electric Cars) लाँच होत आहे. यातच जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. या बातमीनुसार भारतीय बाजारात पुढील काही दिवसात 5 जबरदस्त इलेक्ट्रिक कार्स लाँच होणार आहे.
महिंद्रा लाँच करणार दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स
भारतीय ऑटो कंपनी महिंद्रा नोव्हेंबर महिन्यात दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स करण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, महिंद्रा 26 नोव्हेंबर रोजी दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स लाँच करणार आहे. कंपनी BE 6E आणि XEV 9e या नावाने दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार्स लाँच करणार आहे. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि उत्तम रेंज मिळण्याची शक्यता आहे.
मारुतीची ई विटारा बाजारात करणार एंट्री
तर देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकी जानेवारी 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी मारुती आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची चर्चा बाजारात सुरु आहे.
इलेक्ट्रिक क्रेटा ही दाखवणार दम
ऑटो कंपनी ह्युंदाई देखील इलेक्ट्रिक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकर ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. माहितीनुसार, 2025 च्या पहिल्या तिमाहीत कंपनी भारतीय बाजारात ही लाँच करणार आहे.
टाटा इलेक्ट्रिक हॅरियर लाँच करणार
तर दुसरीकडे टाटा देखील लोकप्रिय एसयूव्ही कार हॅरियर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. टाटा ही कार 2025 च्या पहिल्या तिमाहीत आणणार आहे. कंपनीने फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या भारत मोबिलिटीमध्ये या शानदार कारची झलक देखील दाखवली होती.