ऐन दिवाळीतच राडा, रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘या’ दिवशी होणार लाँच

  • Written By: Published:
ऐन दिवाळीतच राडा, रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘या’ दिवशी होणार लाँच

Royal Enfield Electric Bike: गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी झपाट्याने वाढत आहे. आज बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स आणि जास्त रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटर उपल्बध आहे. त्यामुळे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक बाइकची (Electric Bike) देखील मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच बाजारातील लोकप्रिय ऑटो कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield) सर्वांना धक्का देत पहिली इलेक्ट्रिक बाइकचा टिझर रिलीज केला आहे.

सध्या इलेक्ट्रिक बाइकचा टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कंपनीकडून इंस्टाग्रामवर इलेक्ट्रिक बाइकचा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टिझरमध्ये कंपनीची पहिली इलेक्ट्रिक बाइक कोणत्या दिवशी बाजारात लाँच होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. या टिझरमध्ये कंपनीने या शानदार बाइकसह एक पॅराशूट देखील दाखवलं आहे. कंपनी पुढील महिन्यात म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लाँच करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Royal Enfield (@royalenfield)

तर दुसरीकडे कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक कोणत्या नावाने लाँच करणार आहे याबाबत कंपनीने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. इटलीमध्ये EICMA 2024 कार्यक्रमादरम्यान कंपनीने ही बाइक प्रदर्शित केली होती. काही मीडियावर रिपोर्ट्सनुसार, या बाइकमध्ये फ्रंट आणि रियरमध्ये फेंडर, इंडिकेटर, हेडलॅम्प आणि सिग्नेचर रेट्रो स्टाइल लुक देण्यात येणार आहे .

तर दुसरीकडे रॉयल एनफिल्डची ही बाइक सिंगल चार्जवर 200-250 किमीची रेंज देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे मात्र याबाबत कोणतीही माहिती कंपनीने शेअर केलेली नाही. तसेच या बाइकची किंमत भारतीय बाजारात 1.50 लाख रुपये असू शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कंपनी या बाइकमध्ये अलॉय व्हील, राऊंड मिरर, राऊंड इन्स्ट्रुमेंट पॅनल देऊ शकते.

ठरलं, राजकीय थ्रिलर ‘मॅच फिक्सिंग’मध्ये दिसणार सुपरस्टार विनीत कुमार सिंग! 

माहितीनुसार सध्या या बाइकला Electrik01 असे कोडनेम देण्यात आले असून ही बाइक कंपनीच्या L प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार असल्याची माहिती देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. याच बरोबर कंपनी या प्लॅटफॉर्मवर आधारित सर्व इलेक्ट्रिक ॲडव्हेंचर टूरर डेव्हलप करण्याची तयारी करत आहे जी हिमालयन इलेक्ट्रिक नावाने लाँच होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या