Vida VX2 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल, 142 किमी रेंज अन् किंमत फक्त 60 हजार

Vida VX2 : भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिरो मोटोकॉर्पने कंपनीची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर Vida VX2 लॉन्च केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 59,490 रुपये आहे. बाजारात कंपनीकडून गो आणि प्लस या दोन व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लॉन्च करण्यात आली आहे.
Vida VX2 रेंज
Vida VX2 च्या गो व्हेरियंटमध्ये कंपनीने 2.2 kWh बॅटरी दिली आहे. जी एका चार्जवर 92 किमी रेंज देते, तर टॉप-स्पेक VX2 प्लसमध्ये 3.4 kWh बॅटरी आहे जी एका चार्जवर 142 किमी रेंज देते. याच बरोबर या स्कूटरमध्ये AC फास्ट चार्जिंग पर्याय देखील आहे जो बॅटरी फक्त 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करतो. गो व्हेरियंटची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास 53 मिनिटे घेते अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे गो व्हेरियंटमध्ये इको आणि राइड असे दोन रायडिंग मोड देण्यात आले आहे. गो व्हेरियंटचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे, तर प्लसचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. या स्कूटरच्या सीटखाली दोन काढता येण्याजोग्या बॅटरी आहेत. या सहजपणे काढता येतात आणि घरी चार्ज करता येतात.
Vida VX2 फीचर्स
कंपनीने या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्ण एलईडी इल्युमिनेशन, GPS ट्रॅकिंग, रिमोट इमोबिलायझेशन, 4.3-इंच पूर्ण डिजिटल कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 33.2-लिटर अंडर-सीट स्टोरेज सारखे फीचर्स दिले आहे. याचबरोबर या स्कूटरमध्ये तुम्हाला बॅक पिलियन बॅकरेस्ट, 12-इंच डायमंड कट फिनिश अलॉय व्हील्स, फ्रंट डिस्क ब्रेक सारखे फीचर्स पाहायला मिळणार आहे.