TVS चा भारतीय बाजारात धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत आहे फक्त …

TVS चा भारतीय बाजारात धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत आहे फक्त …

TVS iQube : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) क्रेझ झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोक कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. यातच भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी TVS ने आपली सर्वात स्वस्त स्कूटर लाँच केली आहे.

कंपनीकडून लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर iQube चा सर्वात स्वस्त व्हेरियंट लाँच करण्यात आला आहे. TVS iQube ST या नावाने नवीन व्हेरियंट लाँच करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीसाठी तुम्हाला 95 हजार रुपये (एक्स शोरूम किंमत) मोजावे लागणार आहे. कंपनीच्या अधिकृत डीलरशिप किंवा वेबसाइटवर तुम्हाला ही स्कूटर बुक करता येणार आहे.

TVS iQube रेंज आणि बॅटरी पॉवर

या नवीन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना बेस ट्रिमला 2.2kWh बॅटरी पॅक मिळणार आहे. जो सिंगल चार्जवर 75 किलोमीटरची रेंज देते. कंपनीनुसार, या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 75 किमी/तास इतका असणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते.

जर ग्राहकांना अधिक पॉवर आणि रेंज हवी असेल तर कंपनीने ही स्कूटर 3.4kWh आणि 5.1kWh बॅटरी क्षमतेसह उपलब्ध करून दिली आहे. या ट्रिममध्ये तुम्हाला अनुक्रमे 100 आणि 150 किमीची रेंज कंपनीकडून ऑफर करण्यात येत आहे.

TVS iQube फीचर्स

नवीन व्हेरियंटमध्ये कंपनीने एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स दिले आहे. ग्राहकांना या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले कंपनीकडून देण्यात येणार आहे, या डिस्प्लेच्या मदतीने ग्राहकांना या स्कूटरबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे. याच बरोबर या स्कूटरमध्ये 32 लीटर अंडर सीट स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच या स्कूटरमध्ये दमदार सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहे.  यामुळे जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या स्कूटरचा विचार करू शकतात.

T20 World Cup 2024 सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, ICC ची ‘ही’ चूक पडू शकते महागात

TVS iQube बाजारात Ather इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा आहे. Ather ने काही दिवसापूर्वी आपली एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Rizta नावाने लाँच केली आहे. त्याची किंमत 1.10 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला  दोन बॅटरी पॅकसह कंपनीकडून देण्यात आले आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर 160 किमीची रेंज देते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या