LIVE : अमेरिका इस्त्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार; नव्या नेत्याची घोषणा, युद्ध पेटलं, पाहा अपडेट

इराणचे लष्कर, सरकारी वृत्तसंस्था आयआरएनए आणि मुख्य वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने आता अधिकृतपणे अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

Iran War

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई (Israel Iran War) अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले.  फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मारले गेले. इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला. त्यांच्या निशाण्यावर सुरूवातीपासूनच आयातुल्ला अली खामेनेई होते. शेवटपर्यंत आयातुल्ला अली खामेनेई यांना इराणची सत्ता सोडण्यासाठी अमेरिकेकडून धमकावले जात होते. शेवटी अमेरिकने आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केले. इराणचे लष्कर, सरकारी वृत्तसंस्था आयआरएनए आणि मुख्य वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने आता अधिकृतपणे अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

एका निवेदनात, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इमाम खमेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांना श्रद्धांजली वाहिली. संघटनेने त्यांच्या मृत्युला महान नेता शहीद म्हणून वर्णन केलं. त्याचबरोबर त्यांच्या मार्गावर आम्ही पुढ जाऊ असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूला अमेरिका आणि झिओनिस्ट राजवटीला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसंच, या घटेनंतर कठोर कारवाई आणि बदला घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जनतेला राष्ट्रीय एकता आणि ताकद दाखवण्याचं आवाहनही आपल्या निवेदनात करण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Mar 2026 11:10 AM (IST)

    खामेनेई यांच्या निधनानंतर मस्जिदवरील ध्वज काळा करण्यात आला

    इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी इमाम रझा मस्जिदवरील ध्वज काळा करण्यात आला.

  • 01 Mar 2026 11:10 AM (IST)

    इराणसोबत चर्चा करणं आता सोपं झालं

    इराणसोबत चर्चा करणं आता सोपं झालं. खामेनींच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराणचा कारभार चालवण्यासाठी 3 जणांची समिती स्थापन. राष्ट्रपती, सरन्यायाधीश यांचा समितीत समावेश.

  • 01 Mar 2026 11:10 AM (IST)

    पुण्यातील 80 विद्यार्थी दुबईत अडकले

    इस्त्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे दुबईमध्ये गेलेले अनेक भारतीय नागरिक विद्यार्थी अडकले असून ते परतीच्या प्रतीक्षेत आहेत पुण्यातील 80 विद्यार्थी देखील दुबईत अडकले असून हवाई वाहतूक सुरळीत झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

  • 01 Mar 2026 10:48 AM (IST)

    अमेरिकेला याची किंमत मोजावी लागणार

    सर्वोच्च नेते गमावल्याचं आम्हाला दु:ख… अमेरिकेला याची किंमत मोजावी लागणार… सर्वात मोठा प्रतिहल्ला करणार… खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचा इशारा…

  • 01 Mar 2026 10:48 AM (IST)

    इस्रायलच्या IDF मुख्यालयावर इराणचा हल्ला

    इस्रायलच्या IDF मुख्यालयावर इराणचा हल्ला करण्यात आला आहे.

  • 01 Mar 2026 10:48 AM (IST)

    इराणच्या हल्ल्याचा कतारकडून निषेध व्यक्त

    इराणच्या हल्ल्याचा कतारकडून निषेध व्यक्त…इराणला योग्य उत्तर दिलं जाईल…कतारचा इराणला इशारा…

  • 01 Mar 2026 10:47 AM (IST)

    भारतातील ड्रायफ्रूट आयात धोक्यात

    अमेरिका इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे भारतातील ड्रायफ्रूट आयात धोक्यात.. एपीएमसी वाशी, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर, मालाडमध्ये दरवाढीची चर्चा.. मिठाई, हॉटेल, बेकरी, केटरर्स आणि फूड इंडस्ट्रीला मोठा फटका बसण्याची शक्यता..

  • 01 Mar 2026 10:45 AM (IST)

    आयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजतबा इराणचे सर्वेसर्वा

    ​वडिलांच्या मृत्यूनंतर मोजतबा यांनी तात्काळ इराणच्या धार्मिक आणि लष्करी यंत्रणेवर नियंत्रण मिळवले.

    त्यांना 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'चा (IRGC) पूर्ण पाठिंबा

    मोजतबा हे त्यांच्या वडिलांपेक्षाही अधिक कठोर आणि जहाल विचारांचे मानले जातात.

    पदभार स्वीकारताच त्यांच्याकडून इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध "अंतिम युद्धाची" घोषणा.

    दुबई आणि इतर आखाती देशांवरील ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमागे मोजतबा यांचेच आदेश असल्याचे मानले जात आहे.

    त्यांनी अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

    मोजतबा यांच्या नेतृत्वाखाली इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम अधिक आक्रमकपणे राबवणार.

  • 01 Mar 2026 10:20 AM (IST)

    अयातुल्लाह खामेनींचा मृत्यू, अमेरिकेत जल्लोष

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनींचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू.. वॉशिग्टन डीसी शहरात हजारो अमेरिकन नागरिकांचा जल्लोष.. तर मुस्लिम समुदायाकडून वॉशिंग्टन शहरात अल्ला हु अकबरच्या घोषणा..

  • 01 Mar 2026 10:08 AM (IST)

    इराण अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत

    अमेरिका इस्रायल इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इराण अधिक आक्रमक भूमिका घेतान दिसतोय. अमेरिकेवर हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आलीये.

follow us