खामेनेईंना मारल्यास युद्ध संपणार? उत्तराधिकारी कोण असणार? इस्त्रायलच्या विविधानाने चर्चांना उधाण

Iran Israel War end if Khamenei killed? Who will successor? Israel’s statement sparks discussions : इराण आणि इस्रायलमध्ये (Iran Israel War) सध्या युद्ध सुरु आहे. मानव जातीला रक्तरंजीत करणारं हे युद्ध आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. यामुळे सबंध जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे असं सध्याचं चित्र आहे.मात्र यामध्ये जर इस्त्रायलने इराणचे मुख्य नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना मारलं तर काय होणार? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
मोठी बातमी! हरभजन अन् युवराज सिंह ED च्या कचाट्यातच ‘हा’ अभिनेताही अडकला, चौकशी सुरू
दरम्यान या अगोदर 2024 च्या मेमध्ये इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निवडणुकांद्वारे पेजेशकियन यांना राष्ट्रपती निवडण्यात आलं आहे. मात्र नुकत्याच झालेल्या इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक अधिकारी मारले गेले. त्यानंतर काही तासांतच इराणने (Iran Israel War) त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र जर इस्त्रायलने इराणचे मुख्य नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना मारलं तर त्यांच्या जागी लगेचच दुसरे नेते येणार का? त्यांना मारणं एवढं सोप आहे की?
भाजप नेत्यांची आधी आगपाखड आता स्तुतिसुमने; सुधाकर बडगुजर येताच ‘पवित्र’ झाले…
1989 मध्ये अयातुल्ला रूहोल्लाह खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अली खामेनेई यांनी इराणचं प्रमुख पद सांभाळलं होतं. खामेनेई यांनी देशांतर्गत विरोधासह आंतरराष्ट्रीय तणावा दरम्यान इराणवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. त्यांचा प्रभाव केवळ इराणच नाही तर जगभरातील शिया मुस्लिमांवर आहे. दुसरीकडे इस्त्रायल इराणच्या युद्धामध्ये (Iran Israel War) खामेनेई देखील निशाण्यावर आहेत. त्यामुळेइस्त्रायलने इराणचे मुख्य नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना मारलं तर काय होणार? याचा परिणाम जगभरात होणार का?
खामेनेई यांचं वय 86 वर्ष आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकार अगोदरच नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जरी इस्त्रायलने (Iran Israel War) त्यांच्यावर हल्ला केला नाही. तरी देखील त्यांचा कार्यकाल लवकरच संपणार आहे. मात्र युद्धामुळे ही परिस्थिती लवकर येऊ शकते. दुसरीकडे इराणचे मुख्य नेते असलेल्या खामेनेई यांना मारण्याचा कट इस्त्रायलने आखला आहे. खामेनेई त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1979 च्या इस्लामी क्रांतीपासून ते इस्लामिक रिपब्लिकनचा मुख्य चेहरा आहेत. त्यांनी इराणचे शासन मोहम्मद रजा पहलवी यांना सत्तेतून बेदखल केलं होतं.
जयंत पाटील भाजपात जाणार? खासदार निलेश लंकेंनी एकाच वाक्यात सांगितलं…
मात्र मीडियामध्ये सध्या पसरत असलेल्या खामेनेई यांच्या हत्येच्या कटाच्या बातम्या इस्त्रायलच्या (Iran Israel War) पंतप्रधानांनी नाकारल्या आहेत. मात्र दुसरीकडे त्यांनी खामेनेई यांना मारल्याने हे युद्ध थांबेल असे देखील म्हटलं आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे की, इस्त्रायलकडून इराणचे नेते खामेनेई यांची हत्या केली जाऊ शकते. त्यांच्या हत्येमुळे इराणच्या सत्तेवर येणारे दुसरे नेते इतक्या सहजपणे बाह्य आक्रमण,पाश्चमात्या देशांचा दबाव आणि अंतर्गत विरोध यांचा सामना करू शकेल का? असं देखील बोललं जात आहे.
“मी निष्पाप तरीही माझ्यावर कारवाई, आता मनपा निवडणुकीत..”, भाजपात येताच बडगुजरांनी ठाकरेंना ललकारलं
मात्र इराणचे प्रमुख हे प्रचंड मजबूत सुरक्षेमध्ये राहतात. देशाच्या प्रमुख पदाचा कार्यभा स्विकारल्यानंतर त्यांनी एकदाही देश सोडलेला नाही. या अगोदर 1989 मध्ये ते उत्तर कोरियाला गेले होते. हा त्यांचा शेवटचा प्रवास होता. कारण इस्त्रायलकडून (Iran Israel War) इराणच्या सैन्याचे प्रमुख, रिव्हॉल्यूशनरी गार्ड्स प्रमुख, इराणचे दिग्गज लोकांची हत्या करण्यात आली आहे. त्यावरून हे स्पष्ट दिसते की, इस्त्रायलची इराणच्या नेत्यांवर करडी नजर आहे. नेतन्याहूंचा आदेश आल्यास इराणच्या मुख्य नेत्यांना देखील मारलं जाऊ शकतं.
खामेनेई यांना मारल्यास काय होईल?
यावर बोलताना आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक कमर आगा म्हणतात की, जर खामेनेई यांची हत्या झाली तर त्यांच्या जागी उत्तराधिकारी येईल. मात्र त्यांचा उत्तराधिकारी होण्याची शक्यता असलेले अनेक नेते मारले गेले आहेत. त्यामुळ इराणमध्ये (Iran Israel War) असा कोणताही नेता दिसत नाही. जो खामेनेईंची जागा घेईल. इराणमध्ये खामेनेईंची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांच्या कार्यकाळात इराणने प्रगती केली.यामध्ये सायनस, डिफेन्स तसेच इस्लामी क्रांतिसाठी त्यांनी काम केलं. ते इस्लामी क्रांतीचे चांगले वक्ते होते. त्यामुळे त्यांच्या प्रमाणे इतर कुणी इराणचे सुत्र सांभाळणे अवघड आहे.
Hindavi Patil : दुसऱ्या दुकानांवर कारवाई नाही, माझ्याच का? डोळ्यातले अश्रू पुसून ‘हिंदवी’चा सवाल
खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये (Iran Israel War) इस्लामी शासन आहे. ज्याचं नेतृत्व खामेनेई करतात. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर इराणची विचारसरणी बदलू शकते. मात्र जोपर्यंत इस्त्रायल इराण संघर्ष सुरू आहे. तोवर इराणची सत्ता कट्टल इस्लामी नेत्यांच्याच हातात राहिलं. मात्र भाविष्यात शांतता प्रस्थापित झाल्यास पुरोगामी नतृत्वाला संधी मिळू शकते. मात्र सध्या इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्ष थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.