मोसादचा मास्टरस्ट्रोक! अयातुल्लांचा अंत; कसं आखलं ऑपरेशन रोअरिंग लायन? वाचा, खास स्टोरी
जगातील सर्वात घातक गुप्तहेर संघटना कोण? या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा सिद्ध झालं. वाचा, खास ऑपरेशन रोअरिंग लायनची स्टोरी.
जगातील सर्वात घातक गुप्तहेर संघटना कोण? या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा सिद्ध झालं. (Iran) ज्यावेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना वाटत होतं की ते त्यांच्या सुरक्षित बंकरमध्ये आहेत, त्याच वेळी मोसादचे एजंट त्यांच्या श्वासोच्छवासावर नजर ठेवून होते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेला तो ६० सेकंदांचा हल्ला म्हणजे मोसादच्या दशकांच्या मेहनतीचं फळ होतं. पण मोसादने हे नेमकं कसं केलं? इराणच्या अणुकेंद्रांपासून ते थेट खामेनेईंच्या बेडरुमपर्यंत मोसादने कोणतं जाळं विणलं होतं? पाहा मोसादच्या सर्वात मोठ्या ऑपरेशनचा हा इनसाईड रिपोर्ट…
डिकॅपिटेशन स्ट्राईक, सापाचं डोकं ठेचलं
मोसादने या युद्धात सर्वात मोठी जबाबदारी पार पाडली ती म्हणजे ‘डिकॅपिटेशन स्ट्राईक’ याचा अर्थ शत्रूच्या नेतृत्वालाच संपवून टाकणं. मोसादने गेल्या ६ महिन्यांपासून सीआयएच्या मदतीने इराणच्या सर्वोच्च लष्करी आणि राजकीय नेत्यांच्या हालचालींचं मॅपिंग केलं होतं. ज्यावेळी खामेनेई एका गुप्त बैठकीसाठी बाहेर आले, त्याच क्षणी मोसादने त्यांच्या लोकेशनची ‘पिनपॉईंट’ माहिती इस्रायली हवाई दलाला दिली त्याचक्षणी केवळ एका मिनिटात खामेनेई आणि त्यांचे ७ मुख्य कमांडरला संपवल. शत्रूचं डोकंच कापून मोसादने इराणच्या लष्कराला पोरकं केलं अशी ही घटना.
इराणच्या आतूनच हल्ला, इनसाईडर एजंट्स
मोसादची ताकद केवळ इस्रायलमध्ये नाही, तर ते इराणच्या गल्लीबोळात पसरले आहेत. या युद्धाच्या पहिल्या तासात इराणची रडार यंत्रणा आणि ‘एअर डिफेन्स’ अचानक ठप्प झाली. हे कसं घडलं? मोसादने इराणच्या लष्करातील काही असंतुष्ट अधिकाऱ्यांना आपल्या बाजूला वळवलं होतं. ‘ऑपरेशन जेनेसिस’ अंतर्गत या इनसाईडर एजंट्सनी इराणच्या क्षेपणास्त्र तळांवरूनच माहिती लीक केली आणि अनेक रडार यंत्रणा ‘हॅक’ केल्या. यामुळेच इस्रायलची २०० विमाने इराणच्या आकाशात कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरू शकली.
सायबर वॉर आणि ‘फोडणी’
लढाई केवळ मैदानात नव्हती, ती लोकांच्या मोबाईलमध्येही होती. मोसादने इराणच्या टेलिकॉम नेटवर्कवर असा जबरदस्त सायबर हल्ला केला की, इराणमधील सर्व सरकारी अॅप्स आणि चॅनेल्सवर थेट ‘जनता उठावा’चं आवाहन दिलं गेलं. ‘आपल्या जुलमी सरकारविरुद्ध उठाव करा’ हा मेसेज प्रत्येक इराणी नागरिकापर्यंत पोहोचला. इराणच्या माहिती आणि दळणवळण यंत्रणेचे तुकडे तुकडे करून मोसादने इराणला जगापासून पूर्णपणे तोडलं.
दुबई कनेक्शन, मोसादचं जाळं
इराणने दुबईतील हॉटेल्सना का टार्गेट केलं? कारण मोसादने दुबईत आपली ‘सेफ हाऊसेस’ तयार केली होती, असा इराणचा दावा आहे. इराणला संशय होता की, त्यांच्या शास्त्रज्ञांच्या हत्या आणि खामेनेईंवरील हल्ल्याचा ‘रिमोट कंट्रोल’ दुबईतील याच आलिशान हॉटेल्समध्ये बसलेल्या मोसादच्या हॅकर्सकडे होता. मोसादने दुबईचा वापर एक ‘लिस्निंग पोस्ट’ म्हणून केला, जिथून इराणमधील प्रत्येक हालचाल टीपली जात होती.
इस्रायलमधील भारतीय नागरिकांना महत्वाच्या सूचना, मदतीसाठी केंद्र सरकारकडून मेल, फोन नंबर जारी
ब्लॅकआऊट ऑपरेशन
मोसादने सिद्ध केलंय की, जगातील कोणतीही भिंत त्यांना रोखू शकत नाही. इराणचं अणुकेंद्र असो वा सर्वोच्च नेत्याचा बंकर. मोसादसाठी काहीच अशक्य नाही. मोसादची ही कारवाई केवळ क्षेपणास्त्रांपुरती मर्यादित नव्हती. मोसादने इराणच्या नॅशनल पॉवर ग्रिडवर असा ‘मॅलवेअर’ सोडला होता, ज्याने खामेनेईंच्या हत्येच्या अवघ्या १० मिनिटे आधी संपूर्ण तेहरानमधील वीज घालवली. याला लष्करी भाषेत ‘ब्लॅकआऊट ऑपरेशन’ म्हणतात. जेव्हा रडार आणि कम्युनिकेशन यंत्रणा विजेविना ठप्प झाल्या, तेव्हाच इस्रायली लढाऊ विमानांनी इराणच्या सीमेत प्रवेश केला. मोसादच्या ‘स्लीपर सेल्स’नी इराणच्या लष्करी तळांच्या बाहेर उभं राहून लेझर गायडेड सिस्टिमद्वारे लक्ष्याला मार्क केलं होतं, ज्यामुळे एकही बॉम्ब चुकला नाही.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन
मोसादची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं ‘युनिट ८२००’. या युनिटने खामेनेईंच्या अतिशय जवळच्या वर्तुळातील लोकांचे फोन टॅप केले होते. खामेनेईंच्या खाजगी वैद्यांपासून ते त्यांच्या सुरक्षारक्षकांपर्यंत, प्रत्येकाच्या हालचालींची माहिती मोसादकडं होती. इराणने वापरलेली ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ यंत्रणा मोसादने मोडीत काढली. जेव्हा खामेनेई एका बंकरमधून दुसऱ्या बंकरमध्ये जात होते, तेव्हा त्यांच्या कारमधील जीपीएस सिग्नल मोसादने हॅक केला होता. हा केवळ योगायोग नव्हता, तर हे मोसादच्या ‘सिग्रिंत’तंत्रज्ञानाचं यश होतं.
दुबई ‘लॉजिस्टिकल हब’
आता दुबईवर बोलायचं झालं तर मोसादने दुबईचा वापर ‘लॉजिस्टिकल हब’ म्हणून केला होता. दुबईतील एका प्रसिद्ध हॉटेलच्या ४२ व्या मजल्यावरून मोसादच्या हॅकर्सनी इराणच्या अणुकेंद्रांवर सायबर हल्ले केले होते. इराणला जेव्हा हे समजलं की त्यांचे ‘सेंट्रीफ्युजेस’ स्वतःहून वेगाने फिरून नष्ट होत आहेत, तेव्हा त्यांना जाणीव झाली की मोसाद त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. दुबईतील त्या हॉटेलमधील वाय-फाय नेटवर्कचा वापर करून इराणच्या लष्करी कमांड सेंटर्समध्ये व्हायरस सोडला गेला होता. म्हणूनच चिडलेल्या इराणने थेट त्या हॉटेल्सनाच ‘मिसाईल्स’ने उडवण्याचा प्रयत्न केला. तर असा आहे हा थरार. सांगा तुम्हाला काय वाटतं? मोसादच्या या कारवाईमुळं इराणमधील हुकूमशाही संपेल का? की इराण पुन्हा डोकं वर काढेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरु नका…
