अभिनेता आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; कोण आहे होणारी पत्नी गौरी?
Aamir Khan च्या चाहत्यांसाठी एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आमिर खान आता तिसऱ्यांदा विवाह बंधणात अडणार आहे.
Actor Aamir Khan will be getting married for the third time who is his future wife Gauri : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता अमिर खानच्या चाहत्यांसाठी एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आमिर खान आता तिसऱ्यांदा विवाह बंधणात अडणार आहे. NDTV हिंदी या वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे कोण आहे त्याची होणारी पत्नी पाहूयात…
Vijay Patkar Exclusive : चित्रपट महामंडळानं दहा वर्षात काय केलं? विजय पाटकरांचा हल्लाबोल
अभिनेता आमिर खान लवकरच त्याची गर्लफ्रेंड गौरी फ्रेंड तिच्यासोबत विवाह बद्ध होणार आहे. याबाबत आमिर खानच्या जवळच्या व्यक्तींनी याबाबत एनडीटीव्ही हिंदी या वृत्त वाहिनीला माहिती दिली आहे. आमिरचा हा तिसरा विवाह सोहळा पाच जुलैला होणार आहे. हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि जवळच्या व्यक्तींमध्येच केला जाणार आहे. आमिरच्या जवळच्याच व्यक्तींना सांगितलं आहे की, आमिर आणि गौरी हे एक वर्षापासून एकत्र राहतात. त्यांचे एक आनंदी कुटुंब आहे. जे आता ते अधिकृत करणार आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच आमिरने गौरीला आपली पत्नी असल्याचे सांगितलं होतं.
कोण आहे गौरी स्प्रॅट?
गौरी स्प्रॅट बेंगळुरूची राहिवासी आहे. तिच्या लिंक्डिन प्रोफाईलवर दिलेल्या माहितीनुसार तिने ब्लू माउंटेन स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तिने फॅशन संबंधित कोर्स केला. तसेच तिने युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स, लंडनहून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. 2025 मध्ये तिच्याशी संवाद साधला असता तिने सांगितलं होतं की, ती आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर गौरीला एक 6 वर्षांचा मुलगा आहे. तर आमिर खानला ती 25 वर्षांपासून ओळखते. तर ते एकमेकांना 2 वर्षांपासून डेट करत आहेत.