SIR प्रक्रियेला मुदत वाढ; मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी शेवटची संधी, 13 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
Maharashtra Voter List SIR 2026; SIR 2026 अंतर्गत मतदार नोंदणी आणि दावे-हरकती नोंदवण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Voter registration deadline extended to November 13: महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने आणखी वेळ दिला आहे. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदवणे, तसेच दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत आता 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
लंडनमधून परतली, कुटुंबीयांपासून संपर्क तुटला; पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह
31 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या यादीतील सुमारे 1.22 कोटी मतदारांच्या जुन्या नोंदी तपासताना काहींच्या नोंदी जुळल्या नाहीत, तर काहींच्या माहितीमध्ये चुका किंवा विसंगती आढळल्या. त्यामुळे या मतदारांना नोटीस पाठवून आवश्यक कागदपत्रे मागवण्यात आली होती.
या 1.22 कोटी मतदारांपैकी 1.16 कोटी म्हणजेच 95 टक्के मतदारांनी आवश्यक कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे त्यांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. उर्वरित 6 लाख मतदारांची कागदपत्रे मिळवण्याचे काम सुरू आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) या मतदारांशी संपर्क साधत आहेत.
MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; अहिल्यानगरमधून आले पत्र!
या कामात राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (BLA) BLO यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
दरम्यान, ज्यांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही, अशा नवमतदारांनाही आता संधी मिळणार आहे. गणना प्रपत्र भरताना व्यक्ती घरात नसल्यामुळे, दुसरीकडे स्थलांतरित झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ज्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत आलेले नाही, अशा पात्र नागरिकांनाही अर्ज करता येणार आहे.
न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा मोठा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यर गोलंदाजांवर नाराज
त्यासाठी 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत प्रपत्र 6 भरून अर्ज करावा. प्रारूप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासून पात्र नागरिकांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.